शिक्षिकेला खंडणी मागून तिचा विनयभंग प्रकरण न्यायालयात…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत कुर्ली येथील केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळेतील एका सहाय्यक शिक्षिकेला खंडणी मागून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी पीडित शिक्षिकेच्या लेखी तक्रारीवरुन आरोपी माजी सरपंच विलास राजन्ना बडगुलवार (वय 48), सतिष लचमारेड्डी गड्डमवार (वय 49), सहाय्यक शिक्षक दिपक महाकुलकर (वय 45), सहाय्यक शिक्षक किसन किनाके (वय 50) व सहाय्यक शिक्षक नितीन मुद्देलवार (वय 36) सर्व रा. कुर्ली (ता. घाटंजी) आदीं विरुद्ध पारवा पोलिस ठाण्यात भादंवि कलम 384, 354 (A), 143, 149, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. मात्र, तपासाअंती सदर घटना घडलीच नसल्याने व सदर प्रकरणात पुरावे नसल्याने पारवा पोलिस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार गोरख चौधर यांनी घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात ब समरी फायनल दाखल केला.

विशेष म्हणजे सदरचा ब समरी फायनल फेटाळून, त्याला दोषारोपपत्र म्हणून स्विकारण्यात यावे, अशी मागणी पिडीत शिक्षिकेने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे (यवतमाळ) व मुंबई उच्च न्यायालयाच्या मुंबई खंडपीठ व नागपूर येथील प्रशासकीय न्यायमुर्ती यांचे कडे केली आहे.

पीडित सहाय्यक शिक्षिका (वय 50) ही घाटंजी तालुक्यातील कुर्ली येथील केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळेत सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत होती. 12 जुलै 2021 रोजी दुपारी 12.15 वाजता शाळेत विद्यार्थी नसल्याने पीडित शिक्षिका मुख्याध्यापक कार्यालयात एकटीच बसुन होती. तेवढ्यात संशयीत आरोपी विलास बडगुलवार, सतिष गड्डमवार, सहाय्यक शिक्षक दिपक महाकुलकर, सहाय्यक शिक्षक किसन किनाके व नितीन मुद्देलवार हे सर्व जण कार्यालयात आले व पीडित शिक्षिकेला दिपक महाकुलकर व किसन किनाके यांनी म्हटले की, तुमची डिलिव्हरी झाली काय? असे म्हटले असता, पिडीत शिक्षिकेने त्यांना म्हटले की, तुम्हाला लाज वगैरे आहे की नाही असे म्हटले. तसेच शिक्षकांनी पिडीतेला सांगितले की, झोपायला येते काय? कशी मजा येते अशा अश्लील भाषेत बोलून पिडीत शिक्षिकेला जिवे मारण्याची धमकी दिली. तुमचे प्रकरण बंद करायचे असेल तर पिडीत शिक्षिकेला 1 लाख 50 हजार रुपये (दिड लाख रुपये) द्यावे लागेल व आमचे सोबत रात्र घालावी लागेल असे म्हणून शरीर सुखाची मागणी केली. तसेच या पुर्वी सुद्धा विलास बडगुलवार, सतिष गड्डमवार, सहाय्यक शिक्षक दिपक महाकुलकर, सहाय्यक शिक्षक किसन किनाके व सहाय्यक शिक्षक नितीन मुद्देलवार यांनी मला वारंवार वाईट उद्देशाने शरीर सुखाची मागणी करुन शिवीगाळ करत होते. अशा पिडीत शिक्षिकेच्या लेखी रिपोर्ट वरुन पारवा पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा तपास पारवा पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरख चौधर यांनी केला होता.

दरम्यान, 5 जानेवारी 2024 रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या न्यायालयातून पिडीत शिक्षिकेला एक नोटीस प्राप्त झाली. त्यात यवतमाळ येथे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्या निजी कक्षात 6 जानेवारी रोजी दुपारी 2.45 वाजता उपस्थित राहावे, असे सांगण्यात आले. तदनंतर पिडीत शिक्षिकेची प्रकृती बरी नसल्याने तिने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमुर्ती नितीन सांबरे, यवतमाळ येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे व घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश ए. ए. उत्पात आदींना रजिस्टर पोस्टाने अंतीम लेखी जबानी व उत्तर पाठविले आहे. त्यात प्रकरण मिटविण्यासाठी तत्कालीन ठाणेदार गोरख चौधर यांनी आरोपीतांना पैशाची मागणी केली. त्यात तडजोड होउन आरोपीतर्फे पैसे देण्यात आले, असेही लेखी जबानीत आरोप करण्यात आला आहे. तसेच कायद्यानुसार पोलिसांना विनयभंग 354 (अ) प्रकरणात ब समरी फायनल न्यायालयात दाखल करता येत नाही. त्यामुळे घाटंजी दिवाणी व फौजदारी न्यायालयात दाखल केलेला ब समरी फायनल फेटाळून, त्याला दोषारोपपत्र म्हणून स्विकारण्यात यावे, असे लेखी जबानी व उत्तर पिडीत शिक्षिकेने न्यायालयात सादर केले आहे.

शिक्षकाचे 3-3 शिक्षिकांसोबत अश्लील चाळे; Video Viral…

शाळेच्या सहलीदरम्यान विद्यार्थी आणि शिक्षिकेचा रोमान्स अन् पुढे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!