
धक्कादायक Video: कोयत्याने सपासप वार अन् कारने चिरडलं…
बंगळूरू (कर्नाटक): एका टोळक्याने एकमेकांवर तलवारीने वार केले. एवढंच नाहीतर एकाला कारखाली चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.
कर्नाटकच्या उडपी भागातील कुंजीबेट्टू परिसरात ही घटना घडली आहे. गँगवॉरचा हा व्हिडीओ 18 मे रोजीचा आहे. गँगवॉरमधून कापू भागातील तरुणांच्या दोन टोळक्यांमधील वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन वाहनांमधून आलेल्या टोळक्यांनी एकमेकांवर हल्ले केले. एकमेकांवर वाहनं चढवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. उडपी-मणिपाल राष्ट्रीय महामार्गावरील या घटनेचा व्हिडीओ तिथल्या एका रहिवाशाने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत दोन जणांना अटक केली आहे. शिवाय, गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या तलवारी, सुरे, एक स्विफ्ट कार, दोन दुचाकी आणि इतर शस्त्र जप्त केली आहेत.
दरम्यान, कर्नाटकमधील कायदा सुव्यवस्थेबद्दलचा हा व्हिडीओ भाजपने शेअर केला आहे. गँगवॉर, तरुणीवर बलात्कार, मारहाण, हत्या, बॉम्बस्फोट, गांजा, ड्रग्स, रेव्ह पार्ट्या, पाकिस्तान जिंदाबादचे नारे, हे सगळं कर्नाटक सरकारच्या काळात सुरू आहे, असं म्हणत मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांना टॅग करण्यात आले. पोलिसांचा कुठेच धाक उरला नाही, त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असे म्हणत भाजपने टीका केली आहे.
ಕರ್ನಾಟಕ ಮಾಡೆಲ್!
ಗ್ಯಾಂಗ್ ವಾರ್ಗಳು, ಯುವತಿಯರ ಮೇಲೆ ಅತ್ಯಾಚಾರ, ಹಲ್ಲೆ, ಹತ್ಯೆ, ಬಾಂಬ್ ಬ್ಲಾಸ್ಟ್ಗಳು, ಗಾಂಜಾ, ಅಫೀಮು, ರೇವ್ ಪಾರ್ಟಿಗಳು, ಪಾಕೈಸ್ತಾನ್ ಜಿಂದಾಬಾದ್ ಘೋಷಣೆಗಳು ಸೇರಿ ಇತ್ಯಾದಿಗಳು @INCKarnataka ಸರ್ಕಾರದ ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ಕಾಮನ್ ಆಗಿದೆ.
ಉಗ್ರರು, ಮತಾಂಧರು, ಪುಂಡರು, ಕಿಡಿಗೇಡಿಗಳು ರೌಡಿಗಳಿಗೆ @siddaramaiah… pic.twitter.com/s0SVgbBYW2
— BJP Karnataka (@BJP4Karnataka) May 25, 2024
पुणे अपघात प्रकरणात अगरवाल कुटुंबीयांचा आणखी एक कारनामा समोर…
पुणे शहरात पोर्शे गाडीने दोघांना चिरडले; पाहा घटनाक्रम…
Video: वाहनचालकाला हृदयविकाराचा झटका; आठ जणांना चिरडले अन्…
Video: पिरंगुट घाटात भरधाव टेम्पोने अनेकांना चिरडले…
Video क्रूरतेची हद्द! युवकाच्या अंगावर ८ वेळा ट्रॅक्टर घालून चिरडले…
कारने पाच युवतींना चिरडले; अंगावर काटा आणणारा Video…

