फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणातील PSI बदने याला जामीन; पाहा 3 अटी…

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथे एका महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्येप्रकरणी गेल्या पाच महिन्यांपासून अटकेत असलेला निलंबित पोलीस उपनिरीक्षक (PSI) गोपाळ बदने याला मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने त्याला 50 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

फलटणमधील 23 ऑक्टोबर 2025 रोजी एका हॉटेलमध्ये महिला डॉक्टरने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांना अटक करण्यात आली होती. बदने गेल्या पाच महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत होता. त्याने जामिनासाठी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये अर्ज केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्याला दिलासा दिला आहे.

महिला डॉक्टरने मृत्यूपूर्वी तिच्या हातावर एक नोट लिहिली होती. पीएसआय गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोघांची नावे लिहून त्यांनी शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचे नमूद केले होते. त्यामुळे फलटण पोलिसांनी गोपाळ बदनेसह प्रशांत बनकरला अटक केल होती. या प्रकरणानंतर राड्यात संतापाची लाट उसळली होती. अखेर कोर्टाने युक्तिवाद ऐकल्यानंतर पाच महिन्यानंतर जामीन मंजूर झाला आहे. कोर्टाने जामीन मंजूर केला असला तरी गोपाळ बदनेला तीन अटी घातल्या आहेत.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

अटी पुढीलप्रमाणे…
– जामीनानंतर बाहेर गेल्यानंतर कोणत्याही प्रकारे फिर्यादी पक्षाच्या साक्षीदारांवर दबाब आणू नये तसेच फिर्यादी पक्षाच्या पुराव्यामध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार करायचा नाही.
– सुनावणीच्या प्रत्येक तारखेला हजर राहिला पाहिजे. तपास अधिकाऱ्याकडे आधार आणि पॅनकार्ड, सविस्तर पत्ता, फोन नंबर, जवळच्या दोन नातेवाईकांची माहिती द्यावी.
– कोणत्या अटीचा भंग केल्यास जामीन रद्द करण्यात येईल.

दरम्यान, महिला डॉक्टरने आत्महत्येपूर्वी आपल्या हातावर सुसाईड नोटच्या स्वरूपात काही वाक्ये लिहिली होती. या मजकुरात त्यांनी नमूद केले आहे की, “पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर याने मला सतत मानसिक त्रास दिला. या धक्कादायक खुलाशानंतर पोलीस यंत्रणा आणि आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

फलटण डॉक्टर प्रकरणाचा IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात होणार तपास…

फलटण प्रकरणात सस्पेन्स वाढला, WhatsApp चॅटींगमध्ये वेगळाच ट्रँगल…

फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय…

फलटणमधील मृत डॉक्टर प्रकरणी पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर…

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणातील आरोपी PSI गोपाल बदणे अटकेनंतर म्हणाला…

फलटणमधील डॉक्टर युवती हॉटेलवर का गेली? कारण आलं समोर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!