
ग्राहकाने एक चिकू दाबून पाहिला अन् नको ते घडले; पोलिसांचे आवाहन…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीन गावात एका चिकूवरून दोन गट भिडल्याची घटना घडली आहे. या घटनेत पाच ते सहा जण जखमी झाले असून, गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.
चिकूच्या गाडीवर चिकू विकत घेताना एका ग्राहकाने एक चिकू दाबून पाहिला. चिकू दाबल्यामुळे तो फुटला त्यामुळे विक्रेता आणि ग्राहकामध्ये वाद झाला. वादानंतर तुफान हाणामारीला सुरुवात झाली. दोन गट आपसात भिडले. या घटनेत पाच-सहा जण जखमी झाले आहेत. तणावाची परिस्थिती पाहता अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवावी लागली. या प्रकरणी बिडकीन पोलिस ठाण्यात दोन्ही गटातील एकूण 17 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिडकीन पोलिसांत रईस शेख बाबू (वय 33, व्यवसाय फळविक्रेतो रा. बागवान गल्ली बिडकीन ता. पैठण जि. छ. संभाजीनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ‘त्यांचा अल्पवयीन भाचा बिडकीन बस स्टँड परिसरात फळाच्या दुकानात बसला होता. यावेळी तिथे कृष्णा वाघ हे चिक्कू घेण्यासाठी आले. त्यांनी चिक्कू दाबून पाहिले असता तो चिकू फुटला. यावेळी दुकानात बसलेल्या मुलाने चिक्कू फोडू नका असे म्हणल्यावरून दोघांमध्ये वाद झाला. सुरवातीला शाब्दिक वाद सुरू झाला आणि त्यांनतर दोघांमध्ये हाणामारी झाली. यात चिकू विकत असलेला मुलगा जखमी झाला. याची माहिती फिर्यादी रईस शेख हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी आपल्या भाचाला घाटी रुग्णालयात नेले.
रईस शेख हे आपल्या भाच्याला रुग्णालयात घेऊन जात असताना आणखी काही जण तिथे जमा झाले. त्यामुळे पुन्हा वाद सुरू झाला. त्यामुळे काही वेळात दोन्ही गटाचे लोकं जमा झाले. दोन्ही गटाकडून एकमेकांना हाणामारी सुरू झाली. तर याचवेळी काहींनी दगड फेकून मारले. तसेच एकाने बाजूला असलेल्या सलूनच्या दुकानातून आणलेला वस्तारा मारल्याने त्यात एक जखमी झाला. या संपूर्ण राड्यात पाच-सहा जण जखमी झाले असून, त्यांच्यावर बिडकीन शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, दोन्ही गटाच्या नागरिकांना पांगवले आणि परिस्थिती आटोक्यात आणली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नयेत म्हणून, पोलिस मुख्यालयातून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला आहे. तसेच, पोलिसांकडून गावात संचलन करण्यात आले. सध्या गावात शांतता असून, पोलिसांचा बंदोबस्त मात्र कायम आहे.
बिडकीन पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश सुरवसे म्हणाले की, ‘बिडकीन बस स्टँड परिसरात चिक्कूवरून दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीत काही लोक जखमी झाले आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी दोन्ही गटाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही जणांना अटक देखील करण्यात आली आहे. गावात सध्या शांतता असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.
छत्रपती संभाजीनगरमध्ये कंपनीला भीषण आग; सहा कामगारांसह श्वानाचा मृत्यू…
छत्रपती संभाजीनगर हादरलं! अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार…
धक्कादायक! छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरच केली आत्महत्या…
Video: इतकं मारा की गाxx ची हड्डी तुटली पाहिजे: अब्दुल सत्तार
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

