
पुणे! दामिनी मार्शल सोनाली हिंगे यांची तत्परता अन् कुटुंब आले एकत्र…
पुणे (संदिप कद्रे): आई-वडिलांच्या भांडणाला कंटाळून एका दहावीत शिकणाऱ्या मुलीने घर सोडले. मात्र, तिला वेळीच मदत मिळाल्याने तिच्या घरातील नात्यांचा तिढा संपुष्टात आला आणि सर्वांचं मनोमिलन झाले. यामुळे मुलगी आनंदी असून, तिने दामिनी मार्शल सोनाली हिंगे यांचे आभार मानले आहेत.
शिवाजीनगर पोलीस स्टेशनमधील दामिनी मार्शल सोनाली हिंगे यांनी सांगितले की, 18 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांना एका दहावीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीचा फोन आला होता. ‘मी घर सोडून जात आहे आणि मला मदतीची गरज आहे,’ असे मुलीने सांगितले. संबंधित मुलीचे आई-वडील एकत्र राहत नव्हते. घटस्फोटाचा कोर्टात खटला सुरू असल्याने मुलगी मानसिक तणावाखाली होती.
मुलीचा फोन आल्यानंतर सोनाली हिंगे यांनी तत्काळ मुलीच्या शाळेत संपर्क साधून शाळेच्या प्राचार्यांची भेट घेतली. त्यानंतर मुलीच्या पालकांना शाळेत बोलावून त्यांच्याशी देखील हिंगे यांनी सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर मुलीच्या आई-वडिलांचे मनोमिलन होऊन त्यांनी घटस्फोटाचा निर्णय मागे घेतला. पीडित मुलीच्या पालकांशी मार्शल सोनाली हिंगे यांनी चर्चा केली. “तुमची मुलगी तुमचं भविष्य आहे. अशा कोवळ्या जिवाला जपा, सदर मुलगी हि 10 वी कक्षेमध्ये शाळेमध्ये टॉपर आहे.” अशी भावनिक साद त्यांनी मुलीच्या पालकांना घातली. त्यानंतर मुलीच्या पालकांनी मतभेद बाजूला सारून घटस्फोट घेण्याचा निर्णय रद्द केला.
सदर मुलगी ही तिच्या आई बाबांसोबत एकत्र राहण्यास मिळत आहे, म्हणून खूप खुश झाली. सदर मुलीने, प्रिन्सिपल आणि सदर मुलीच्या पालकांनी दामिनी मार्शल व पोलीस प्रशासन पुणे शहर यांचे खूप मनापासून आभार मानले आहे. सदरची कामगिरी म पो शी 10920/हिंगे शिवाजीनगर पो ठाणे यांनी केलेली आहे.
दरम्यान, दामिनी मार्शल पथकांची 2015 मध्ये स्थापना करण्यात आली आहे. हे पथक महिलांचे रक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तयार करण्यात आले आहे. या पथकाला असंख्य महिलांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
28) पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!
29) पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी: शिक्षक ते पोलिस अधिकारी प्रेरणादायी प्रवास!
30) पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण: डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
31) पोलिस उपायुक्त मोनिका राऊत: जिद्दी महिला अधिकारी!
32) सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे: स्वच्छंदी जीवन जगलेला अधिकारी!
33) सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर देशमुख: पोलिस अधिकारी पदाला गवसणी!
34) वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड: लढवय्या पोलिस अधिकारी!
35) वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण चव्हाण: गोरगरिबांना न्याय देणारा अधिकारी!
36) वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील: पोलिस दलातील डॅशिंग अधिकारी!
37) वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे : डॅशिंग महिला पोलिस अधिकारी!
38) वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनकर कदम: सकारात्मक विचारांचा अधिकारी!
39) सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. धर्मराज बांगर : डॉक्टर ते पोलिस अधिकारी!
40) सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते : दुग्ध व्यावसायिक ते जिद्दी पोलिस अधिकारी!
41) सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत तोडकर : तंत्रज्ञानात हातखंडा असलेला अधिकारी!
42) सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार : गुन्हे उघड करण्याची आवड असलेला अधिकारी!
43) पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी : सायबर गुन्हेगारीमधील तज्ज्ञ अधिकारी!
44) पोलिस उपनिरीक्षक विजय लोंढे : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
45) पोलिस उपनिरीक्षक सचिन वाकडे : जिद्द आणि यश खेचून आणणारा अधिकारी!
46) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अश्फाक तांबोळी : मोठा जनसंपर्क असलेला अधिकारी!
47) श्रेणी पोलिस उपनिरीक्षक रवींद्र बागुल : आरोपींसाठी भारतभर तसेच देशाबाहेर भ्रमण!
48) सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक नितीन धोंडगे: मदतीसाठी सदैव तत्पर असणारा सहकारी!
49) वैशाली घरटे-गवळी : पोलिस दलामुळे अश्रू पुसण्याचे भाग्य!
50) अश्विनी देवरे-शेवाळे : पोलिस दलातील जिद्दी आयर्नमॅन!
51) गणेश कोंडे : पोलिस दलातील श्वान पथकावर नितांत प्रेम!
52) IPS सत्य साई कार्तिक! पोलिस दलाच्या माध्यमातून देश सेवा करणारा अधिकारी!

