
तोतया पोलिसाला न्यायालयाबाहेर पकडले पैसे उकळताना…
भोपाळ (मध्य प्रदेश): भोपाळ जिल्हा न्यायालयाबाहेर पैसे उकळताना पकडलेल्या बनावट पोलिसाने पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासा केला आहे. आनंद सेन असे या तोतया पोलिसचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.
पोलिस तपासात त्याने सांगितले की, ‘भोपाळला येण्यापूर्वी त्याने छतरपूरमध्ये पोलिस म्हणून काम केले होते. आरोपी हा तिथल्या एका पोलिस चौकीत हवालदार म्हणून तैनात होता. 9 महिन्यांपूर्वी तो आपल्या कुटुंबासह भोपाळला आला होता.’
पोलिसांनी सांगितले की, आरोपीच्या धक्कादायक खुलाशानंतर पोलिसांशी सपंर्क केला जात आहे. तो बनावट पोलिस आहे. तसेच 4 वर्षांपासून तो पोलिसात काम करत होता. मात्र, आतापर्यंत ही माहिती कुणालाच कळू शकली नाही. आरोपी आनंद सेन हा सोशल मीडियावरही खूप सक्रिया होता. इन्स्टाग्रामवर तो पोलिस अधिकारी, पोलिस वाहने, तसेच वर्दीमध्ये अनेक फोटो अपलोड करायचा. तसेच तो याच वर्दीच्या आधारावर लहान दुकानदार आणि वाहन चालकांना थांबवून पैसे वसूल करायचा.
दरम्यान, आरोपी आनंद सेन याला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
गुजरातमध्ये पाच वर्षे सुरू होते बनावट न्यायालय; वकीलच बनला न्यायाधीश अन्…
नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS…
पुणे शहरात तोतया पोलिसाकडून पोलिस कर्मचाऱ्याला धक्काबुक्की…
सॅल्युट करताना पोलिसांना संशय आला अन् अलगद सापडला…
आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीला तोतया ईडी अधिकाऱ्याचा फोन; म्हणाला…

