विद्यार्थिनीला मेसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला मारहाण; व्हिडिओ व्हायरल…

जयपूर (राजस्थान): एक शिक्षक विद्यार्थिनीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून तो विद्यार्थिनीला वारंवार मेसेज करून त्रास देत होता. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला पकडून तोंडाला काळं फासले आणि बेदम मारहाण केली. याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षिकाने सुद्धा मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीगंगानगर जिल्ह्यातील पदमपूर उपविभागातील 7DD गावातील हे प्रकरण आहे. गावातील सरकारी शाळेचे शिक्षक राजेश कुमार यांना सोमवारी गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली. ग्रामस्थांनी शिक्षकाच्या तोंडाला काळे फासले आणि व्हिडिओही बनवण्यात आला. संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ परिसरात चर्चेचा विषय बनला आहे.

शिक्षकाला मारहाण करणाऱ्या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांचा आरोप आहे की, ‘शिक्षकाने विद्यार्थिनीला फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. हा प्रकार कुटुंबीय व ग्रामस्थांना समजताच ते संतप्त झाले. त्यांनी शाळेत पोहोचून शिक्षकाला पकडून बेदम मारहाण केली. शिक्षण विभागाने त्याची चौकशी करण्यासाठी विभागीय चौकशीची स्थापना केली आहे.’

दरम्यान, दोन्ही बाजूकडून एकमेकांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी शिक्षक राजेश कुमार यांच्यावर विद्यार्थिनीला मेसेज पाठवून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शिक्षक राजेश कुमार यांनी विद्यार्थिनीच्या कुटुंबाविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिक्षकाने ब्लॅकमेल करत असल्याचे स्टेटस ठेवून केली आत्महत्या…

शिक्षकाने बॅड टच करत तुला पीटी क्लास कसा वाटला? असे विचारले अन्…

धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाकडून बलात्कार…

Video: लाईव्ह रिपोर्टिंग दरम्यान महिला पत्रकाराचा विनयभंग…

प्राध्यापकाने विमानात केला डॉक्टर युवतीचा विनयभंग…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!