सना खान यांच्या हत्या प्रकरणात हाय व्होल्टेज ड्रामा…

नागपूर : भाजप नेत्या सना खान यांच्या हत्या प्रकरणात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. मध्य प्रदेशचे आमदार संजय शर्मा यांनी नागपूर पोलिसांसमोर हजर राहून सना खान आणि त्यांच्या प्रकरणातील आरोपींशी आपला कुठलाही संबंध नसल्याचा दावा केला. तर दुसऱ्या बाजूला सना खान यांच्या आई मेहेरूनिस्सा खान यांनी सना खान यांच्या हत्या प्रकरणाचा तपास भरकटवण्यासाठी हनी ट्रॅपचा मुद्दामध्ये आणल्याचा आरोप केला आहे.

सना खान (वय ३४) या भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या कार्यकर्त्या होत्या. सना खान हत्येप्रकरणी सना खान यांचे कथित पती अमित साहू, अमितचे मित्र राजेश सिंह, धर्मेंद्र यादव, रविशंकर यादव आणि कमलेश पटेल अशा पाच आरोपींना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. याच आरोपींशी जुना संबंध असल्याच्या संशयावरून मध्य प्रदेशातील तेंदूखेडा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार संजय शर्मा यांना चौकशीसाठी नागपुरात बोलावण्यात आले होते. नागपूरच्या डीसीपी झोन 2 कार्यालयात तब्बल सव्वा दोन तास संजय शर्मा यांची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी चौकशी केली. त्यांची सना हत्या प्रकरणाचा मुख्य आरोपी अमित साहू आणि रविशंकर यादव याच्या समोरासमोर बसून ही चौकशी करण्यात आल्याची माहिती आहे. चौकशीनंतर आमदार संजय शर्मा यांनी या प्रकरणाशी आपला कुठलाही संबंध नाही. आरोपी अमित साहू कधी काळी आपल्याकडे कामावर होता. मात्र, गेले पाच ते सात वर्ष तो आपल्या संपर्कात नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

डीसीपी कार्यालयात आमदार संजय शर्मा यांची चौकशी सुरू असताना सना खान यांच्या आई सुद्धा त्या ठिकाणी पोहोचल्या. कोणीही कितीही मोठा खासदार आमदार असला तरी या प्रकरणात वाचणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. दरम्यान सना खान हत्याप्रकरणाचा हनी ट्रॅप अशी काहीही संबंध नाही हत्या प्रकरणाचा तपास भरकटवण्यासाठीच हनी ट्रॅप ची फोडणी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सना खान हत्या प्रकरणात धक्कादायक वळण; सेक्सटोर्शन रॅकेट अन्…

भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक…

भाजप नेत्या सना खान हत्या प्रकरणात पुढील अपडेट…

…अखेर भाजप नेत्या सना खान यांच्या हत्येचं गुढ उलगडलं

भाजप पदाधिकारी सना खान प्रकरणात गुन्हा दाखल; नोकराने सांगितले की…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!