संतापजनक! नवऱ्याने घेतली बायकोची ‘अग्निपरीक्षा’, प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली चटणी अन्…
जयपूर (राजस्थान) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एकाने पत्नीची अग्निपरीक्षा घेतल्यानंतर प्रायव्हेट पार्टमध्ये चटणी टाकल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेला असह्य वेदना होऊ लागल्यानंतर तिने थेट माहेर गाठले. या घटनेची नोंद पोलिस स्टेशनमध्ये नोंद झाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पाली जिल्ह्यातील बाजी येथे ही घटना घडली आहे. महिलेने माहेरी गेल्यानंतर घडलेला प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, ‘लग्नाच्यानंतर पत्नी मुलगा आणि पती हे गुजरात राज्यात राहायला होते. परंतु, काही दिवसांपूर्वी तिच्या पतीचं स्वभाव बदलला आहे. त्यामुळे तो आपल्या पत्नीला घाणेरड्या पद्धतीच्या शिक्षा देत होता. पती चारित्र्यावर संशय घेत होता. पतीचा आरोप आहे की, त्याची पत्नी इतरांसोबत शारिरीक संबंध ठेवत आहे. या संशय वृत्तीमुळे लोकं तिला मारहाण करीत होती. त्याचबरोबर तिला शारिरीक त्रास सुद्धा दिला आहे. त्या महिलेचा प्रायव्हेट पार्ट जाळण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची टाकली आहे. शिवाय, नवऱ्याने महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फेविकोल सुध्दा टाकले होते.’
दरम्यान, दोघांचे पंधरा वर्षापुर्वी लग्न झाले असून, त्यांना तीन मुलं आहेत. त्यानंतर सुध्दा पती पत्नीवर शंका घेत होता. त्याचबरोबर त्या महिलेला मुलांच्या जवळ सुध्दा येऊ देत नव्हता. पोलिसांनी महिलेची वैद्यकीय चाचणी केली आहे. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
नवऱ्याच्या अनैतिक संबंधावरून कार्यालयातच चपलेने धुलाई…
भावकीमध्ये असलेल्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीने घेतला मोठा निर्णय…
दिराचे वहिनीसोबत अनैतिक संबंध अन् वहिनीचे आणखी…
माता न तू वैरिणी! अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा म्हणून चिमुकल्याचा खून…
बांधकाम व्यावसायिकाच्या प्रेयसीची अनैतिक संबंधातून हत्या…