कुवेतमध्ये इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 41 भारतीयांचा मृत्यू…

कुवेतः कुवेतच्या मंगाफ येथे आज (बुधवार) सकाळी एका उंच इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 43 जणांचा मृ्त्यू झाला असून, 30 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 41 भारतीय नागरिक असल्याचे समजते.

कुवेतमधील भारतीय दुतावासाने याबाबत माहिती देताना म्हटले की, या दुर्घटनेत 30 पेक्षा जास्त कामगार जखमी झाले आहेत. येथील मंगाफ शहरात सकाळी 6 वाजताच्या सुमारास ही आग लागल्याची घटना घडली. ज्या इमारतीला आग लागली ती इमारत कामगारांच्या निवासासाठी वापरण्यात येत होती, जेथे मोठ्या संख्येने कामगार राहत होते. कुवेतच्या दक्षिण अहमदी प्रांतातील मंगाफ भागातील 6 मजले उंच इमारतीत ही आग लागली होती. या इमारतीमधील स्वयंपाक घरातून आगीने पेट घेतला, त्यानंतर ही आग सर्वत्र भडकली. या इमारतीमध्ये 160 जण राहत होते. हे सर्वजण एका कंपनीत काम करत होते. त्यांच्या निवासाची सोय या इमारतीमध्ये करण्यात आली होती.

कुवेतमधील भारतीय दुतावासानेही ट्विटरवरुन पोस्ट लिहिली आहे. भारतीय कामगारांशी संबंधित आगीच्या दु:खद घटनेनंतर तत्काळ मदतसेवेसाठी हेल्पलाईन नंबर (+965-65505246) जारी करण्यात आला आहे. सर्वच भारतीयांनी अपडेट माहितीसाठी या नंबरशी संपर्कात राहावे, सर्वोतोपरी मदत केली जाईल, असे आवाहनही दुतावासाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, कुवेत शहरात लागलेल्या या आगीच्या घटनेवर पराराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीही ट्विट करुन शोक व्यक्त केला.

गुजरातमध्ये गेम झोनमध्ये भीषण आगीत २७ जणांचा होरपळून मृत्यू…

हृदयद्रावक! बेबी केअर सेंटरला भीषण आग, 7 नवजात बाळांचा होरपळून मृत्यू…

बांगलादेशमध्ये भीषण आगीत ४३ जणांचा होरपरळून मृत्यू…

Video: कारखान्यात भीषण आग, 11 मजुरांचा होरपळून मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!