
बीडच्या पोलीस अधिकाऱ्याचा वाल्मिक कराड बाबत खळबळजनक दावा…
बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याचा एन्काऊंटर करण्याची ऑफर मला मिळाली होती, असा दावा बीडचे निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे. वाल्मिक कराड याच्या बोगस एन्काऊंटरसाठी आपल्याला 5-10 कोटींपासून ते 50 कोटींची ऑफर दिली जात होती, असेही कासले यांनी म्हटले. रणजीत कासले यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यामुळे बीडमध्ये पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे.
रणजीत कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस निरीक्षक होते. काही दिवसांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरुन अनेक खळबळजनक दावे केले होते. मात्र, आता त्यांनी वाल्मिक कराड याच्या एनकाउंटरबद्दल केलेल्या दाव्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.
रणजीत कासले म्हणाले, ‘अक्षय शिंदे प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करा, एसआयटी बसवा, अशी बातमी मी टीव्हीवर बघितली. ही एसआयटी बसवून काहीही उपयोग होणार नाही. एसआयटीची बसवायची असेल तर केंद्राची एसआयटी बसवा, तरच यामधून सत्य समोर येईल. मला वाल्मिक कराडच्या एन्काऊंटरची ऑफर देण्यात आली होती. मी म्हणालो, हे पाप माझ्याकडून होणार नाही. 10 कोटी, 20 कोटी, 50 कोटी, अशी वनटाईन ऑफर दिली जाते. तो पोलीस अधिकारी कुठेही असेल तरी त्याला हव्या त्या विभागाला बोलावून घेतले जाते. मी सायबर विभागात होतो. त्यांना माहिती होतं, हा माणूस करु शकतो. याच्यामध्ये दम आहे. मी माझा मोठेपणा सांगत नाही, नाहीतर सोडलेले कुत्रे माझ्या अंगावर भुंकतील.’
पोलिसांची चार लोकांची टीम आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची गुप्त बैठक होते. बैठकीत विचार केला जातो, काय करायचं. त्यानंतर पाच-सहा जणांची दुसरी विश्वासू लोकांची टीम निवडली जाते, ती घटनास्थळी जाते. जसं अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले असतील. एक अधिकारी, दोन अंमलदार, हवालदार, अशी टीम असते. या सगळ्यांना 5 कोटी, 10 कोटी रुपयांची लम्पसम ऑफर दिली जाते. चौकशी झाली तरी आमचं सरकार आहे, आम्ही चौकशीतून तुम्हाला मुक्त करु, असे पोलिसांना सांगितले जाते. अशाप्रकारे बोगस एन्काऊंटर होतो, असे रणजीत कासले यांनी म्हटले आहे.
बीडमध्ये वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा; लगावली कानशिलात…
बीडमध्ये वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा; लगावली कानशिलात…
बीड हादरलं! संतोष देशमुखांनी भावाच्या हत्येचा बदला घेतला, त्याच ठिकाणी संपवलं…
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण! अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप…
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे आरोपींनी केले कबूल; हत्येचे सांगितले कारण…
वाल्मिक कराड याचा आयफोन मधील डेटा रिकव्हर करताच सत्य आलं समोर…
संतापजनक! सरपंच संतोष देशमुख यांना दिल्या नरकयातना; पाठ फोडली, कातडी सोलली…
संतोष देशमुख यांचे फोटो पाहिल्यानंतर बीडमध्ये कडकडीत बंदची हाक; पोलिसांचे जनतेला आवाहन…
संतापाची लाट! क्रौर्याची परिसीमा गाठणारे संतोष देशमुख यांचे व्हिडिओ अन् फोटो…
संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…
मोठी बातमी! वाल्मिक कराड अडचणीत, मकोका अंतर्गत गुन्हा…
संतोष देशमुख हत्या प्रकरण! बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय…
धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू; काही झालं तरी…
वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर, शेतकऱ्यांना लुटले…
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींवर मोक्का…
वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…
वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…
वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…
बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…
बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…
सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…
बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…
वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…
वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…
वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…
वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…
वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…
वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…
बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

