
सैफ अली खानच्या घरात 12 जण असताना हल्लेखोर पळाला कसा? करिनाने तर…
मुंबई : अभिनेता सैफ अली खान याच्या घरात कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही चोराने घरात प्रवेश करून हल्ला केला होता. पोलिसांनी आरोपी अटक केली असून सैफच्या हल्ला प्रकरणी नवा खुलासा समोर आला आहे. सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला तेव्हा घरात 12 लोक उपस्थित असल्याची माहिती तपासादरम्यान पुढे आली आहे.
आरोपी सैफ अली खानच्या घरात चोरीच्या उद्देशाने घुसला त्यावेळी घरात 4 पुरुष सेवक आणि 4 महिला केअर टेकर होत्या. पोलिसांनी घटनेच्या वेळी परिधान केलेले कपडे, घटनेनंतर तो रस्त्यावर दिसलेला शर्ट, सैफचा हल्लेखोर शरीफुल इस्लाम सज्जाद याच्याकडून दुकानातून विकत घेतलेला मोबाईल फोन आणि इअर फोन जप्त केले आहे. पोलिसांनी कपडे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत.
आरोपी दहाव्या मजल्यावर पायऱ्या चढून जहांगीरच्या खोलीच्या बाथरूममध्ये पोहोचला. खिडकीची जाळी तुटल्याचे पोलिस तपासात उघड झाले. आरोपीने तेथून आत प्रवेश करून सैफवर हल्ला केला आणि पळून गेला. आरोपीने दहाव्या मजल्यावर जाण्यासाठी आणि दहाव्या मजल्यावरून अकराव्या मजल्यावर जाण्यासाठी फायर डक्ट जवळील पाईपची मदत घेतली आणि पाईप द्वारे वर चढत असताना खिडकीची कडी तोडून घरात प्रवेश केला होता.
पोलिसांनी आरोपीच्या आई-वडिलांचा नंबर घेतला आणि त्यांना बांगलादेशात फोन केला तेव्हा त्यांनी आरोपी आपला मुलगा असल्याचे सांगितले. हल्ल्यापूर्वी सैफच्या घराची रेकी केली होती. 15 जानेवारीला दुपारी आरोपी त्या भागात फिरत होता. सैफच्या इमारती समोरून गेला तेव्हा त्याला सुरक्षा रक्षकांची संख्या दिसली जी फक्त दोन होती. त्यामुळे त्याने चोरीसाठी ती जागा निवडली होती.
आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामकडून सैफ अली खानवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतर करिनाने मध्यरात्री एका आयपीएस अधिकाऱ्याला फोन केला. मात्र आयपीएस अधिकाऱ्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सैफला रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालायत सैफ अली खानला दाखल केल्यानंतर पोलिसांना संबंधित घटनेची माहिती मिळाली. परंतु करिनाने 100 या पोलीस नियंत्रणाशी संपर्क साधला असता तर नाकाबंदी करुन आरोपीला त्याचदिवशी पकडता आले असते, असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
दरम्यान, आरोपीने बांगलादेशमधून येऊन काही काळ पश्चिम बंगालमध्ये वास्तव्य केले होते. तिथून आधारकार्ड बनवून घेतल्यानंतर त्याने सिमकार्ड खरेदी केले आणि त्यानंतर तो मुंबईला आला. आरोपी मोहम्मदने खुखुमोनी जहांगीर शेख या नावाने सिमकार्ड घेतले होते. तसेच मुंबईतल्या अमित पांडे नावाच्या व्यक्तीने त्याला कंत्राटी पद्धतीने काम मिळवून देण्यात मदत केली असल्याचेही समोर आले आहे. आरोपीने पहिल्यांदा चौकशीत तो कोलकाताचा रहिवाशी असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी कॉल रेकॉर्ड तपासले असता त्याने बऱ्याच बांगलादेशी नंबरवर कॉल केले असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी आरोपीच्या भावाशी संपर्क करून आरोपीची कागदपत्रे मागवली असता कागदपत्रांनुसार तो बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले आहे. हल्ल्यानंतर आरोपी सैफ अली खानच्या घरातून निघाला आणि तिथल्याच एका गार्डनमध्ये तो झोपला होता, असेही समोर आले आहे.
सैफ अली खानवरील हल्लेखोराने पोलिसांना सांगितला ओलीस ठेवण्याचा ‘मास्टरप्लान’…
अभिनेता सैफच्या घरात कसा घुसला? आरोपीने सगळंच सांगितलं; बांगलादेशला पळणार तोच…
अभिनेता सैफ अली खानचा हल्लेखोराला अटक; खरं नाव समोर…
करिना कपूरने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले; चोरटा खूप आक्रमक पण…
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर आरोपी लोकलमध्ये बसला अन्…
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण! मोलकरणीने सांगितला घरातला संपूर्ण घटनाक्रम…
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणी पोलिसांना मोठं यश…
अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा फोटो समोर; बोल किती हवेत, 1 कोटी…
अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांना मोठं यश, आरोपी अटकेत…
अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्यामागचं खळबळजनक कारण आलं समोर…
अभिनेता सैफ अली खानवर घरातच चाकूने हल्ला; मानेवर मोठी जखम; पाहा काय घडलं…

