कौतुकास्पद! मुंढवा पोलिसांनी वाचवला आत्महत्या करणाऱ्या युवकाचा जीव…
पुणे: आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या १८ वर्षीय तरुणास वाचविण्यात मुंढवा पोलिस स्टेशन टिमला यश आले आहे. नागरिकांनी पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक करुन आभार मानले.
मुंढवा पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील बिट मार्शल ड्युटी कर्तव्यावर असणारे पोलिस अंमलदार महेश पाठक, पो.हवा.मेमाणे यांना नियंत्रण कक्ष, पुणे शहर कडून सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे येथे एक मुलगा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याने पोलिस मदतीचा कॉल प्राप्त झाला. त्याचप्रमाणे मुंढवा पोलिस स्टेशन, पुणे शहर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांना देखील याबाबत नियंत्रण कक्ष येथून व्हॉट्सअप द्वारे मदतीबाबत मॅसेज प्राप्त झाला. त्यावरुन व.पो.नि.ताम्हाणे यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस स्टेशनला दिवसपाळी कर्तव्यावर हजर असणारे स.पो.नि. महानोर यांना याबाबत मार्गदर्शन करुन, सुचना देऊन मार्शलसह घटनास्थळी रवाना होणेबाबत आदेश दिले.
स.पो. नि. महानोर, पो. हवा. मेमाणे, पो.हवा. पाठक, पो.हवा. भांदुर्गे, पो.शि.कोकरे हे पाच मिनीटांमध्ये घटनास्थळी गणपती मंदिराचे मागे, सर्वोदय कॉलनी, मुंढवा, पुणे येथे पोहचले. त्याठिकाणी मुलगा प्रणित नरेंद्र जाधव (वय १८) हा इमारतीचे तिसऱ्या मजल्यावरील टेरेसवरुन उडी मारुन आत्महत्या करणेची धमकी देत असल्याने त्याची आई पद्मा ही तिच्या मुलाला वाचविण्यासाठी तेथील नागरिकांना व पोलिसांना विनंती करत होती. त्याठिकाणी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन स.पो.नि. महानोर व पो.हवा. मेमाणे यांनी त्यास बोलण्यात गुंतवूण तो आत्महत्या का करत आहे? असे विचारले असता त्याने त्याचे वडीलांना दारुचे व्यसन असल्याने कौटूंबीक वाद होतात. तसेच कमी शिकलेला असल्याने मला काही एक कामधंदा मिळत नाही म्हणून मला माझा जिव नकोसा झाल्याने मी आत्महत्या करत आहे, असे प्रतिक जाधव सांगू लागला.
यारदम्यान स.पो.नि.महानोर यांनी त्यांचे सोबतचे पो.हवा. भांदुर्गे, पो.हवा. पाठक, पो. शि. कोकरे यांना जिन्याने बिल्डींगचे टेरेसवर जाण्यास सांगीतले. प्रतिक यास पोलिसांची चाहुल लागताच तो उभ्या असलेल्या बिल्डींगचे टेरेसवरुन दूसऱ्या बिल्डींगचे टेरेसवर उडी मारुन पळून जात असताना स.पो.नि. महानोर व त्यांचे सोबतचे पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यास अत्यंत चपळाईने ताब्यात घेतले. प्रतिक यास ताब्यात घेतले नंतर उपस्थित नागरिकांचा व प्रतिकचे आईचा जिव भांड्यात पडला. त्यानंतर उपस्थित नागरिकांनी पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक करुन आभार मानले.
पोलिसकाकांनी आजीला काही मदत हवी आहे का? असे विचारले अन्…
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
पुणे शहरात पोलिस अधिकाऱ्याने पत्नी आणि पुतण्याची हत्या करत संपवलं जीवन…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…