दहा लाखांची खंडणी प्रकरणी पोलिसांची तत्काळ कारवाई; पण लागले वेगळे वळण…

पालघर: वसईतील नायगाव पोलिसांनी अवघ्या सात तासात अपहरण झालेल्या अल्पवयीन बहिण भावाची सुटका केली. पोलिसांनी धडक कारवाई करत अपहरणकर्त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. पण, या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. यातील आरोपी मुलीचा मित्र निघाला आहे.

नायगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार्‍या एका 17 वर्षीय मुलीचे आणि तिच्या 7 वर्षांच्या लहान भावाचे 10 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. नायगाव पोलीस ठाण्यात मुलांच्या वडिलांनी तात्काळ तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तीन पथके तयार केली. पोलिसांनी अवघ्या सात तासात दोन आरोपींना अटक करुन, मुलांची सुखरूप सुटका केली.

अपहरण झालेल्या मुलांच्या वडिलांचे नायगावमध्ये दुकान आहे. त्याच्याकडे काही रोकड रक्कम ही आली होती. शनिवारी त्यांची 17 वर्षांची मुलगी आणि 7 वर्षांचा मुलगा अचानक बेपत्ता झाले होते. त्यांचा सर्वत्र शोध सुरू असताना अचानक मुलीच्या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. ‘तेरी लडकी और लडके को किडनॅप किया हूँ, बच्चोके पेटपे बंब बांधके रखा हूँ, रिमोट मेरे हात में है, एक मिनीट में जान से मार डालूंगा, अगर उनकी सलामती चाहते हो, तो तुम 10 लाख जहॉं अँड्रेस बताउंगा वहा लेके जाना, तुम्हारे बच्चे दोनो बच जाएंगे..’ असे बोलून अपह्त मुलांचा आवाज ही अपहरणकर्त्यांनी ऐकवला. मुलांच्या वडिलांनी तात्काळ नायगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तपासासाठी तीन पथके तयार केली. तांत्रिक विश्लेषण आणि तपास करून पोलिसांनी आरोपींना पैसे देण्याच कबूल करण्याचा वडिलांना सांगितले. पैसे घेण्यासाठी बोलावलं आणि दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या. काशिमिरा येथून मुलगा आणि मुलीची सुखरूप सुटका ही केली. या प्रकरणी जयप्रकाश उर्फ सोनू गुप्ता (वय 23) आणि विपुल तिवारी (वय 20) या दोघांना अटक केली आहे. एक आरोपी अपहरणकर्ता मुलीचा मित्र होता. त्यामुळे या मुलीचा, या अपहरण नाट्यात सहभाग आहे का? किंवा वडिलांच्या कुणी परिचयाचा होता का? याबाबत पोलीस आता तपास करत आहेत. आरोपींना पकडताना झालेल्या झटापटीत पोलीस शिपाई अशोक पाटील यांच्या हाताला दुखापत झाली होती. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

खंडनीसाठी अपहरण! पोलिसांनी मोटारीची डिकी उघडली अन्…

पुणे शहरात गरोदर असल्याचे सांगून युवकाकडे मागितली खंडणी…

बिग बॉस विजेता एल्विश यादवकडे खंडणीची मागणी…

पुणे शहरात खंडणीसाठी डांबून ठेवलेल्या वृध्द महिलेची केली सुटका…

कारच्या काचेवर धमकीची चिठ्ठी चिटकून खंडणी मागणाऱ्यास Unit-2ने केले जेरबंद…

भाजपचा नगरसेवक बारमध्येच अडकला पोलिसांच्या जाळ्यात…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!