सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे आरोपींनी केले कबूल; हत्येचे सांगितले कारण…

बीड: मस्साजोग (ता. केज) गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची कबुली आरोपींनी दिली आहे. हत्याप्रकरणाच्या खटल्याच्या बुधवारी पार पडलेल्या सुनावणीनंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड गँगच्या तीन जणांनी संतोष देशमुख यांची हत्या आपणच केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. त्यामुळे बीडचा आका म्हणून कुख्यात झालेल्या वाल्मिक कराड याचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा रंगली आहे.

सुदर्शन घुले , जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलीस चौकशीदरम्यान आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या सुदर्शन घुले याने पोलिसांना हत्येमागील कारण आणि घटनाक्रम सांगितला. सुदर्शन घुले सुरुवातीला या हत्याप्रकरणात आपला सहभाग असल्याचे नाकारत होता. मात्र, पोलिसांनी त्याला आवादा कंपनीच्या मॅनेजरकडून खंडणी मागतानाचा व्हिडीओ दाखवल्यानंतर तो पोपटासारखा बोलायला लागला. सुदर्शन घुले याने, ‘होय, आम्हीच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांचा खून केला’, अशी कबुली पोलिसांना दिली.

आवादा कंपनीच्या आवारात संतोष देशमुख याने आम्हाला मारहाण केली. त्यादिवशी आमच्या मित्राचा वाढदिवस होता, तेव्हाच संतोष देशमुखने आम्हाला मारले. यानंतर या मारहाणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करुन संतोष देशमुख याने आम्हाला आव्हान दिले होते. याचा राग आमच्या मनता होता. तसेच आवादा कंपनीकडून खंडणी मिळण्यात संतोष देशमुख याचा अडथळा येत होता. त्यामुळे आम्ही 29 डिसेंबरला विष्णू चाटेच्या कार्यालयात एक बैठक घेतली. त्यानंतर नांदूर फाट्याजवळील तिरंगा हॉटेलमध्येही विष्णू चाटे याच्यासोबत बैठक झाल्याची कबुली सुदर्शन घुले याने दिली. आरोपी महेश केदार याने संतोष देशमुखांची हत्या करताना आपण व्हिडीओ शुट केल्याची कबुली पोलिसांना दिली. तर जयराम चाटे यानेही त्याच्याविरोधातील सर्व आरोप मान्य केले आहेत. त्यामुळे आता या सगळ्यांचा आका असलेल्या वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेल्याचे दिसत आहे.

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या खटल्यात ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी बुधवारी पहिल्यांदा युक्तिवाद केला. यावेळी उज्ज्वल निकम यांनी एक महत्त्वाचा पुरावा न्यायालयासमोर सादर केला. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याने वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे याला तीनवेळा फोन केले होते. याचा सीडीआर रिपोर्ट उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर मांडला. पोलिसांच्या आरोपपत्रात याचा उल्लेख नव्हता. त्यामुळे उज्ज्वल निकम यांनी न्यायालयात सादर केलेला सीडीआर रिपोर्ट याप्रकरणातील गेमचेंजर पुरावा मानला जात आहे.

walmik-karad-sunny-athawale
walmik-karad-sunny-athawale

वाल्मिक कराड याचा आयफोन मधील डेटा रिकव्हर करताच सत्य आलं समोर…

संतापजनक! सरपंच संतोष देशमुख यांना दिल्या नरकयातना; पाठ फोडली, कातडी सोलली…

संतोष देशमुख यांचे फोटो पाहिल्यानंतर बीडमध्ये कडकडीत बंदची हाक; पोलिसांचे जनतेला आवाहन…

संतापाची लाट! क्रौर्याची परिसीमा गाठणारे संतोष देशमुख यांचे व्हिडिओ अन् फोटो…

संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…

मोठी बातमी! वाल्मिक कराड अडचणीत, मकोका अंतर्गत गुन्हा…

संतोष देशमुख हत्या प्रकरण! बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय…

धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू; काही झालं तरी…

वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर, शेतकऱ्यांना लुटले…

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींवर मोक्का…

वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…

वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…

वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…

बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…

बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…

सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…

बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…

सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…

वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…

वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…

संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…

वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…

वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…

वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…

वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…

संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…

बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…

महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!