पुणे अपघात! कारला चावी तशीच राहिली अन् 11 विद्यार्थ्यांना उडवलं; तिघांना अटक…

पुणे : पुणे शहरातील सदाशिव पेठेत असलेल्या भावे हायस्कूलजवळ एका कारने एमपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या 11 विद्यार्थ्यांना उडवले आहे. विद्यार्थी हे चहा पिण्यासाठी थांबले असताना हा अपघात घडला आहे. या घटनेनंतर कार चालकासह कार मालक आणि त्याच्या सहकाऱ्याला सुद्धा विश्रामबाग पोलिसांनी अटक केली आहे. जखमी विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलजवळ स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी त्या परिसरात राहतात. शनिवारी (ता. ३१) संध्याकाळी सगळे विद्यार्थी तिथं चहा घेत होते. चालकाचं नियंत्रण कारवरील सुटल्यानंतर त्यानं विद्यार्थ्यांना धडक दिली. या घटनेत 11 जण जखमी झाले आहेत. विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार सुरु आहेत, 2 विद्यार्थी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर कार चालकासह कार मालकाला सुद्धा अटक करण्यात आली आहे. जयराम शिवाजी मुळे असे या चालकाचे नाव असून, दिगंबर माधव शिंदे हा या गाडीचा मूळ मालक आहे. जयराम मुळे याच्यासोबत असलेला सहकारी राहुल गोसावी याला सुद्धा केली पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे याने त्याच्या मालकीच्या कारची चावी निष्काळजीपणे तशीच गाडीला सोडून बाहेर गेल्यामुळे त्याचा सहकारी जयराम मुळे याने त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसताना देखील त्याचा सहकारी राहुल गोसावी याच्यासोबत दारूच्या नशेत वाहन थेट सदाशिव पेठेत नेले. या अपघातात 11 लोकांना किरकोळ व गंभीर जखम केल्याप्रकरणी आता तीन जणांना अटक करण्यात आली आहे. या तिघांना आज पुणे न्यायालयात हजर करण्यात येईल, अशी माहिती आहे.

विद्यार्थी नेहमीप्रमाणे चहा घ्यायला येत असतात. समोर कार आली आणि कारचालकाचं नियंत्रण सुटलं. तो गाडी चालवताना दारूच्या नशेत होता. कार भरधाव वेगाने आली आणि चहा पिण्यासाठी थांबलेल्या 11 जणांना उडवलं, यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना संचेती आणि मोडक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि विश्रामबाग पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. जखमींपैकी काही विद्यार्थ्यांची आज (रविवारी) परीक्षा होती. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असल्याने आज त्यांना पेपर देता येत नाही.

HSRP Number Plate नसेल तर किती भरावा लागेल दंड…

वैष्णवी हगवणे प्रकरणात सर्वात महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती…

पुणे अपघात! निबंध लिहण्याची ‘कठोर’ शिक्षा देणारे चौकशीच्या कचाट्यात…

पुणे! दीपक मानकर यांच्यानंतर आता त्यांच्या मुलावर देखील गुन्हा दाखल…

Video: पुणे पोलिसांनी टोळक्याला पळू-पळू मारले; पळती भुई झाली थोडी…

पुणे! निलेश घारेकडून स्वत:च्याच कारवर गोळीबाराचा डाव; कारण…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!