
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण! अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप…
मुंबईः मस्साजोग (ता. केज, जि. बीड) गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे केज-बीड रस्त्यावरील टोल नाक्यावरून अपहरण झाले होते, त्यावेळी सरपंच यांची गाडी चालवत असलेल्या व्यक्तीला कोयता लावला गेला आणि अपहरण झाले. त्यानंतर या व्यक्तीने संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना याबाबत घटनाक्रम सांगितला होता. धनंजय देशमुख यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास त्या व्यक्तीला सांगितले होते. प्रत्यक्षदर्शी पोलीस स्टेशनला गेले, मात्र त्यांना पोलीस स्टेशनमध्ये तीन ते साडेतीन तास बसवून ठेवल्याचे त्यांनी आपल्या जबाबमध्ये म्हटले आहे. यावरून केज पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केला आहे.
अंजली दमानिया म्हणाल्या, ‘प्रत्यक्षदर्शीचा जबाब सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि त्यालाच साडेतीन बसवून ठेवले. पीआय महाजन आणि बनसोडे हेच अधिकारी होते, त्यामुळे हे अधिकारी या संपूर्ण कटात शामिल होते. पोलीस अधिकाऱ्यांनी हे प्रकरण पाहिले असते तर संतोष देशमुख वाचले असते. आवादा कंपनीने तर 8 महिने म्हणजे मे महिन्यापासून तक्रार केली होती. 28 मेला एका कर्मचाऱ्याचे अपहरण यांनी केले, सातपुडा बंगल्यात हे केले गेले. मे महिन्यापासून हे सुरू झाले. पीआय महाजन यांना या कटाची कल्पना होती. अनेक गोष्टी त्यांना माहिती होत्या. पीआय महाजन यांना सहआरोपी करा, अशी मागणी मी केली आहे. चार्ज शिटमध्ये त्यांचे नाव नाही. 10 पोलीस अधिकाऱ्यांची यादी आहे. त्यांना सहआरोपी करायला हवे. त्यांनी आरोपींची मदत केली आहे. काही कटात ते शामिल आहेत.’
सुदर्शन घुले याचे स्टेटमेंट अर्धवट आहे. गुन्हा कसा घडला? एवढेच आहे, पण ते कुठे गेले? फरार कुठे झाले? भिवंडीत कसे आले? पुण्यात कसे आले याची माहिती दिलेली नाही. मी एक ट्वीट ही केले आहे. पोलिसांनी देखील स्टेटमेंट कसे घेतले? या सगळ्यांना धनंजय मुंडे कॉर्डिनेट करत होते. सगळ्या गोष्टी व्हॉट्सअप चॅटवर आहेत. पण, यांना सहआरोपी केले तर पुरावे समोर येतील, म्हणून त्यांना वाचविल जात आहे. तिघांचा जबाब सारखाच आहे. सुदर्शन घुले कुठे गेला? कुठे राहिला? पैसे कोणी दिले? हा घटनाक्रम कुठे आहे? असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे.
संबंधित प्रकरण 8 ऑक्टोबरपासून झालेले नाही तर त्या आधीपासून झालेले आहे. याच्या बैठका सातपुडा बंगल्यात झाल्या होत्या. धनंजय मुंडे, कराड या बैठकीला उपस्थित होते. याला यंत्रणा जबाबदार आहे. वाचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शंभुराज देसाई म्हणतात की, कुणाल कामरावर थर्ड डिग्री वापरा. पण, यांचे काय? तसेच कृष्ण आंधळे कुठे आहे? त्यावर नाही वापरायचा का? येत्या बुधवारी मी संभाजीनगरला जाणार आहे. सगळे मुद्दे न्यायालयीन समितीकडे देणार आहे, असेही अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याचे आरोपींनी केले कबूल; हत्येचे सांगितले कारण…
वाल्मिक कराड याचा आयफोन मधील डेटा रिकव्हर करताच सत्य आलं समोर…
संतापजनक! सरपंच संतोष देशमुख यांना दिल्या नरकयातना; पाठ फोडली, कातडी सोलली…
संतोष देशमुख यांचे फोटो पाहिल्यानंतर बीडमध्ये कडकडीत बंदची हाक; पोलिसांचे जनतेला आवाहन…
संतापाची लाट! क्रौर्याची परिसीमा गाठणारे संतोष देशमुख यांचे व्हिडिओ अन् फोटो…
संतोष देशमुख यांच्या अपहरणाची वेळ आणि तिघांच्या फोनवरील संभाषांची वेळ…
मोठी बातमी! वाल्मिक कराड अडचणीत, मकोका अंतर्गत गुन्हा…
संतोष देशमुख हत्या प्रकरण! बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय…
धनंजय देशमुख यांचे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू; काही झालं तरी…
वाल्मिक कराड याचा आणखी एक कारनामा समोर, शेतकऱ्यांना लुटले…
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सातही आरोपींवर मोक्का…
वाल्मिक कराडनंतर मुलगाही अडचणीत; पिस्तूलाचा धाक दाखवत…
वाल्मिक कराड याच्या कारवाईचा आवळला फास; नेते चौकशीच्या रडारवर…
वाल्मीक कराड याचा आणखी एक कारनामा समोर…
बीड जिल्ह्यात 2024 मध्ये 40 खूनाचे तर 191 खुनाचे प्रयत्न…
बीड शहर पोलिस मुख्यालयातील पोलिसकाकाची गळफास घेऊन आत्महत्या…
सुदर्शन घुले! मिशी कापली, लघवीला जातो म्हणाला अन् थेट गुजरातला पळाला…
बीड पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या…
सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील फरार आरोपी सुदर्शन घुलेसह, सुधीर सांगळेला घेतलं ताब्यात…
वाल्मिक कराडनंतर आणखी एक मोठा मासा गळाला; पण तो कोण?…
वाल्मिक कराड अडचणीत! संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्याची पोलिसांसमोर कबुली…
संतोष देशमुख प्रकरणात एसआयटी स्थापन, 10 अधिकाऱ्यांचा समावेश; पाहा नावे…
वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी…
वाल्मिक कराड प्रवास: घरगडी ते बीडमधील महत्त्वाचा सत्ताकेंद्र…
वाल्मिक कराड अखेर शरण! पुण्यातील CID ऑफीसमध्ये लावली हजेरी…
वाल्मिक कराड याच्या सरेंडरबाबत CID च्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती…
संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे Video मिळाले; हत्येवळी एका वरिष्ठ नेत्याला 16 कॉल…
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला नवे वळण; अहवालात भयंकर छळ अन् क्रूर…
बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…

