अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी…

मुंबईः अभिनेता सलमान खान याला पुन्हा एकदा धमकी आली आहे. मुंबईच्या वरळी येथील वाहतूक विभागाच्या व्हॉट्सऍप नंबरवर सलमानसंदर्भातला धमकीचा मेसेज आला आहे. तसेच, याच मेसेजमध्ये सलमान खानला घरात घुसून मारण्याचीही धमकी देण्यात आली आहे. दरम्यान, सलमान खान धमकी प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

अभिनेता सलमान खान याला सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. काळवीट शिकार प्रकरणी सलमान खान गेल्या कित्येक वर्षांपासून बिष्णोई गँगच्या निशाण्यावर आहे. यातच काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) माजी आमदार बाबा सिद्दीकी यांची भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी आणि बॉलिवूड यांचे घनिष्ठ संबंध होते. सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी बिष्णोई गँगनं स्विकारली, त्यानंतर अख्खं बॉलिवूड हादरलं होतं. पुढे काही दिवसांतच सलमान खान, शाहरुख खान यांनाही धमक्या देण्यात आल्या आहेत.

बाबा सिद्दीकींच्या हत्येमागील बिष्णोई गँग कनेक्शन समोर आल्यानंतर तात्काळ सलमान खान याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. गेली कित्येक महिने सलमान खान कुठेही जाताना सुरक्षारक्षकांसोबतच मुंबई पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात दिसतो. सलमान खान याच्या वांद्रे येथील घरालाही सुरक्षारक्षकांचा घेराव आहे. तर, वांद्र्यातील गॅलेक्सीमधील घराच्या गॅलरीलाही बुलेटप्रुफ काचा लावण्यात आल्या आहेत. नेहमी कडेकोट सुरक्षेत फिरणाऱ्या सलमानची गाडी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.

दरम्यान, वरळी पोलिसांच्या व्हॉट्सअॅप नंबरवर आलेल्या धमकीच्या मेसेजने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. सलमानची गाडी बॉम्बने उडवून देण्यासोबतच त्याला त्याच्या घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे.

अभिनेता सलमान खान याची सुपारी घेणाऱ्याला पानिपतमधून केली अटक…

अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीने घेतला जगाचा निरोप…

सलमान खानच्या घराबाहेर फायरिंग करुन गेले वांद्रे रेल्वे स्टेशनवर; ओळख पटली…

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणारे अटकेत; चौकशीत धक्कादायक खुलासा…

मुंबई पोलिसांनी हत्येचा कट उधळला; बिश्नोई गँगच्या 5 जणांना अटक…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!