मुंबईतील वांद्रे, खार व सांताक्रूझमधील अंमली पदार्थ तस्करांशी संबंधित असलेल्यांच्या बांधकामांवर बुलडोझर कारवाई…
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने मुंबई पोलिसांनी वांद्रे, खार, सांताक्रूझ आणि अंधेरी पश्चिम परिसरातील अंमली पदार्थ तस्करांशी संबंध असलेल्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर कारवाई केली आहे. यापैकी बहुतेक बांधकामे अनधिकृत आणि अतिक्रमण केलेली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली. यासंदर्भात पश्चिम प्रादेशिक विभाग दोनचे पोलीस उपायुक्त डॉ. मोहित कुमार म्हणाले, की अमली पदार्थ विक्रीविरोधातील मोहिमेचा भाग म्हणून विक्रेत्यांशी […]
अधिक वाचा...तुकाराम मुंढेंच्या दौऱ्यापूर्वी एफडीएची सातारा व कराडमध्ये मोठी कारवाई; ब्लिंकइटला दणका, दिवेकर बेकरी सील…
साताराः अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे शनिवारी कराडमधील शारदीय व्याख्यानमालेत तरूणाईशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एफडीएच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. कराड शहरातील प्रसिद्ध दिवेकर बेकरी तसेच पार्सल सेवा पुरविणाऱ्या ‘ब्लिंकइट’च्या सातारा आणि कराड कार्यालयांवर छापा घालून परवाना निलंबित केला आहे. कराड नगरपालिकेच्या शारदीय व्याख्यानमालेला यंदा नगरपालिकेने एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे […]
अधिक वाचा...दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर कोटाजवळ टेम्पो ट्रॅव्हलर नाल्यास कोसळून ७ जण मृत्यूमुखी, तर १० जण जखमी…
कोटा: चालकाचे नियंत्रण सुटून एक टेम्पो ट्रॅव्हलर बस पुलावरून २० फूट खोल नाल्यात कोसळून झालेल्या अपघातात, ७ प्रवासी मृत्यूमुखी पडले असून १० प्रवासी जखमी झाले आहेत. ही बस मध्य प्रदेशातून राजस्थानातील जयपूरच्या दिशेने जात होती. कोटा जिल्ह्यातील सीमलिया पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज (ता. १७) सकाळी ही दुर्घटना घडली, असे पोलिसांनी सांगितले. सीमलिया पोलीस ठाण्याचे अधिकारी […]
अधिक वाचा...नाशिकमधील अजमेरी बेकरीवर एफडीएचा छापा; १५१ निकृष्ट केक आणि कप केकचा साठा जप्त…
नाशिकः अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नाशिकमधील अजमेरी बेकरीवर छापा घालून, १५१ किलो निकृष्ट दर्जाचे केक आणि कप केकचा साठा जप्त केला आहे. भारतनगर, वडाळा रोड परिसरात ही बेकर आहे. एफडीएने बेकरीला व्यवसाय त्वरित बंद करण्याची नोटीसही बजावली आहे. जप्त अन्नपदार्थांची किंमत ३७ हजार ९९० रुपये इतकी आहे. सणासुदीच्या काळात फेस्टिव्हल ड्राइव्ह २०२६ अंतर्गत एफडीएकडून […]
अधिक वाचा...होणाऱ्या पत्नीसोबत अलिबागला गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; कायदेशीर प्रक्रिया टाळून डॉक्टरने मृतदेह दिला नातेवाईकांच्या ताब्यात…
अलिबागः पर्यटनासाठी अलिबागमध्ये आलेल्या एका तरुणाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूनंतर एका महिला डॉक्टरने कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता, त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. डॉक्टरांच्या या निर्णयामुळे त्याच्या मृत्यूचे गूढ वाढले असून, पोलिसही चक्रावले आहेत. हा तरुण त्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत लॉजवर मुक्कामी थांबलेला असतानाच अचानक मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अलिबागमध्ये पर्यटनासाठी अलिबागमध्ये आलेल्या […]
अधिक वाचा...‘लहरा दो तिरंगा’ यात्रेविरोधात नोटीस बजावल्यानंतर काही तासांतच अभिजित दीपके दिल्ली पोलिसांच्या ताब्यात…
नवी दिल्ली: कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांना शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. कॅनॉट प्लेस येथे पक्षाच्या प्रस्तावित ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते जात होते, असे पोलीस सूत्रांनी सांगितले. सीजेपीचा ‘लहरा दो तिरंगा’ मोर्चा सायंकाळी ५ वाजता कॅनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव होता. आज (ता. १६) सकाळी २० […]
अधिक वाचा...अभिनेता इम्रान खानची उच्च न्यायालयात धाव; ‘भारत सोडा’ नोटिसला आव्हान
मुंबई: अभिनेता इम्रान खान याला २८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे निर्देश देणाऱ्या ‘भारत सोडा’ नोटिशीला त्याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. ओव्हरसीज सिटिझन ऑफ इंडिया (ओसीआय) कार्डधारकांना शांततापूर्ण आंदोलनात सहभागी होण्यास प्रतिबंध करणारी कोणतीही स्पष्ट तरतूद कायद्यात नसल्याचा युक्तिवाद, त्याच्या वकिलांतर्फे करण्यात आला आहे. मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर झालेल्या राजकीय आंदोलनात सहभागी झाल्यामुळे इम्रानला ही […]
अधिक वाचा...पुणे पोलिसात भरती मोठा घोटाळा! नोकरी जाणार…
पुणे: राज्य सरकारच्या खेळाडूंच्या ५ टक्के आरक्षणाचा गैरफायदा घेत, ‘कुराश’ या खेळाची बनावट प्रमाणपत्रे सादर केली. पुणे शहर पोलिस दलात भरती झालेल्या १९ जणांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. या सर्व बोगस उमेदवारांना पोलिस दलातून बडतर्फ करण्यात येणार असल्याची स्पष्ट माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली. १९ बनावट उमेदवारांपैकी १० जणांना अद्याप सेवेत हजर करून […]
अधिक वाचा...बीड! शिक्षकाने केला विद्यार्थिनींचा विनयभंग; पालकांचा चोप अन्…
बीड: गेवराई तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने शाळेतील चिमुरड्या विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बाबतची माहिती मुलींच्या पालकांना मिळाल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी शिक्षकाला अटक केली आहे. लुखामसला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अविनाश ढेरे हा शिक्षक कार्यरत आहे. याच शाळेत शिकणाऱ्या इयत्ता चौथीच्या […]
अधिक वाचा...नाशिक! डोंगराळे अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या डोंगराळे येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याची घटना दहा महिन्यांपूर्वी घडली होती. याप्रकरणी मालेगाव जलदगती न्यायालयात हा खटला चालवण्यात आला. या खटल्याचा आज (शुक्रवार) निकाल लागला असून, नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली आहे. विजय खैरनार असे फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी खैरनारने डोंगराळे येथील […]
अधिक वाचा...
