तरुणाच्या हत्येनंतर संतप्त गावकऱ्यांचा हिंसाचार आणि केली आरोपींच्या घरांची जाळपोळ; मोठा पोलिस बंदोबस्त तैनात…

मुझफ्फरपूर: बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील कर्जा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या महंमदपूर खाजे गावात एका तरुणाच्या निर्घृण हत्येनंतर, मोठा हिंसाचार आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. राजेश्वर राय यांचा मुलगा नवनीत कुमार (वय २०) याची शनिवारी रात्री उशिरा मारहाण करून हत्या करण्यात आली. रविवारी सकाळी शवविच्छेदनानंतर तरुणाचा मृतदेह गावात पोचताच, कुटुंबीय आणि स्थानिक गावकरी संतप्त झाले. त्यांनी मोठा […]

अधिक वाचा...

आंदोलनात गैरवर्तनप्रकरणी महिला पत्रकाराची राहुल गांधी यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल…

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इतर अनेकांविरोधात प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) नोंदवण्याची मागणी करत, नवी दिल्ली जिल्ह्याचे पोलीस उपआयुक्तांकडे (डीसीपी) पत्रकार रिचा पराशर यांनी औपचारिक फौजदारी तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार १२ ऑक्टोबर रोजी घडलेल्या एका घटनेशी संबंधित आहे. त्या सर्वोच्च न्यायालय परिसराजवळ राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाचे वार्तांकन करत होत्या. […]

अधिक वाचा...

सिंधुदुर्ग! कुडाळमध्ये कॉलेज युवतीची प्रेमप्रकरणातून क्रूरपणे हत्या…

सिंधुदुर्ग : कुडाळ तालुक्यातील वर्दे-कडावल मुख्य रस्त्याजवळील एका ओढ्याच्या बाजूला दामिनी किरण पालव (वय २३, रा. वर्दे खालची पालववाडी) या महाविद्यालयीन युवतीचा तीक्ष्ण हत्याराने वार करून अत्यंत क्रूरपणे खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. संशयित आरोपी संशयित साहिल विश्राम धुरी याला पोलिसांनी मध्यरात्री चार वाजता अटक […]

अधिक वाचा...

नाशिक! नवरात्र बंदोबस्तावरील पोलिसांना कारने उडवले; पोलिस अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू तर…

नाशिक: सप्तश्रुंगी गड परिसरातील नांदुरी येथील अभोणा चौफुलीवर एका भरधाव अनियंत्रित कारने कर्तव्य बजावत असलेल्या पोलिसांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक (psi) विजय गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला असून, बंदोबस्तावरील ११ हून अधिक पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि भाविक गंभीर जखमी झाले आहेत. नवरात्रीनिमित्त सप्तश्रुंगी मातेच्या दर्शनासाठी राज्यभरातून लाखो भाविक वणी […]

अधिक वाचा...

कोल्हापूर हादरलं! मंदिर परिसरात स्पीकरचा आवाज अन् मुलीचा चिरला गळा…

कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे एका १५ वर्षीय मुलीची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित मुलगी मंदिर परिसरात असताना अज्ञात हल्लेखोराने तिच्या गळ्यावर वार केला. हा वार इतका गंभीर होता की यात मुलीचा गळा अर्धा चिरला. या भयावह हल्ल्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला. ऐन नवरात्री उत्सवाच्या […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात पोटच्या मुलीवर बलात्कार अन् गरोदर; बापाला जन्माची अद्दल…

पुणे : पुणे जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका नराधम बापानं आपल्या पोटच्या लेकीवर अत्याचार केले आणि ती गरोदर असल्याचे समजताच बाप तिला सोडून पसार झाला. याप्रकरणी बापाला जन्माची अद्दल घडली आहे. कोर्टाने आता आरोपीला सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपी बाप २०२२ मध्ये आपल्या मुलीसह वीटभट्टीवर काम करत होता. २७ […]

अधिक वाचा...

बँकेची ३२ कोटी रुपयांची फसवणूक; बांधकाम कंपनीसह स्टेट बँकेच्या माजी मुख्य व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल…

पुणे: केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेने, रिअल इस्टेट व्यवसायात गुंतलेल्या एका भागीदारी फर्म, तिचे भागीदार आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या तत्कालीन मुख्य व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी संगनमताने बँकेची ३२ कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तपास सुरू केला आहे. कर्जदारांनी पुण्यात आलिशान स्वतंत्र व्हिलांच्या बांधकाम आणि विकासासाठी खेळते भांडवल मंजूर […]

अधिक वाचा...

अभिजीत दीपके यांना न्यायालयात सशर्त जामीन मंजूर; शांतता भंगाबाबत सक्त इशारा…

नवी दिल्लीः कॉक्रोरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांना दिल्ली न्यायायाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. दीपके यांना शांतता बंधपत्रावर स्वाक्षरी करण्यास सांगण्यात आले आहे. दिल्ली पोलिसांनी आज सकाळी अभिजीत दीपके यांना अटक केली होती. पोलिसांनी त्याच्यावर शांतता भंग केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम १२६/१७० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस […]

अधिक वाचा...

रॅपिडो कंपनीविरोधात पुण्यात गुन्हा दाखल, प्रशासनाकडून कंपन्यांना दुचाकी टॅक्सी सेवा त्वरित थांबवण्याचे निर्देश…

पुणे: ‘रॅपिडो’ सारख्या काही कंपन्यांनी, कोणत्याही प्रकारचा अधिकृत परवाना नसताना पुणे शहरात दुचाकी प्रवासी सेवा सुरू केली आहे. ही सेवा त्वरित बंद करावी, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी यापूर्वीच दिले होते. तथापि, रॅपिडो सेवा चालविणाऱ्या रोपन ट्रान्सपोर्ट प्रा. लि. कंपनीविरोधात विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाने स्वतः रॅपिडो […]

अधिक वाचा...

गुजरातमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट; ५ कामगारांचा मृत्यू, विषारी वायूची गळती…

भरूच: गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील रासायनिक उत्पादन करणाऱ्या कंपनीत भीषण स्फोट होऊन ५ कामगारांचा मृत्यू झाला, तर अन्य ५ जण जखमी झाले आहेत. वागरा तालुक्यातील सायखा जीआयडीसी परिसरातील सिनझील फार्माकेम या कंपनीत शुक्रवारी (ता. १६) रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. हायड्रोजनेशन प्रक्रियेदरम्यान झालेल्या स्फोटानंतर विषारी मिथिलीन डायक्लोराइड (एमडीसी) वायूची गळती झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!