अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरनंतर पोलिसांना करावी लागतेय मृतदेहाची राखण…

ठाणे: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला होता. त्याच्या मृतदेहावर कुठे अंत्यसंस्कार करायचे, यावरुन वाद निर्माण झाला होता. अखेर त्याचा मृतदेह उल्हासनगरच्या दफनभूमीत पुरण्यात आला आहे. पोलिसांना आता अक्षय शिंदे याच्या पुरलेल्या मृतदेहाची राखण करावी लागत आहे.

अक्षय शिंदे याच्या कृत्यामुळे आम्ही त्याचा मृतदेह आमच्या परिसरात दफन करु देणार नाही, अशी भूमिका बदलापूर आणि उल्हासनगरमधील स्थानिक नागरिकांनी घेतली होती. याविरोधात अक्षय याच्या पालकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाच्या निर्देशानंतर राज्य सरकारने अक्षय याचा मृतदेह दफन करण्याची जबाबदारी उचलली होती. अखेर उल्हासनगर येथील दफनभूमीत पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात अक्षय शिंदे याचा मृतदेह पुरण्यात आला होता. मात्र, स्थानिक नागरिकांचा रोष लक्षात घेता दफनभूमीतून कोणी पुन्हा अक्षयचा मृतदेह उकरुन बाहेर काढेल, अशी भीती वाटत आहे. त्यामुळे आता पोलिसांचे एक पथक अक्षयचा मृतदेह पुरलेल्या परिसरात 24 तास पहारा देत आहे.

अक्षय शिंदे यांचा मृतदेह अखेर उल्हासनगर इथल्या शांतीनगर स्मशानभूमीत दफन करण्यात आला आहे. या मृतदेहाभोवती सीसीटीव्हीने नजर ठेवली जात असून, पोलीस यंत्रणासुद्धा तैनात करण्यात आली आहे.

दरम्यान, अक्षय शिंदे याच्या पालकांनी आमचा मुलगा निर्दोष असल्याचा दावा केला होता. शाळेतील काही बड्या धेंडांना वाचवण्यासाठी आमच्या मुलाचा बळी देण्यात आल्याचा आरोप अक्षयचे वडील अण्णा शिंदे यांनी केला होता. यानंतर अक्षय शिंदे याच्या पालकांना धमक्या येत असल्याची तक्रार उच्च न्यायालयात त्यांच्या वकिलांनी केली होती. अक्षय शिंदे याच्या पालकांनी आम्हाला उच्च दर्जाची सुरक्षा द्यावी, अशी मागणीही केली होती.

खळबळनक पोस्ट! अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर स्वसंरक्षणार्थ की जाणूनबुजून केलेला कट…

अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचे दहन नाही तर दफन केले जाणार; कारण…

अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणी न्यायमुर्तींनी विचारले पोलिसांना अनेक प्रश्न…

बदलापूर प्रकरण! वकिलाचा दावा अन् संशयास्पद पोलिस चकमकीवर प्रश्न…

बदलापूर अत्याचार! आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाला नवं वळण…

अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झालेल्या पोलिसांच्या गाडीत काय सापडलं पाहा…

अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करणारे स्पेशालिस्ट संजय शिंदे आहेत कोण?

अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची A टू Z स्टोरी…

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर झाडली गोळी!

बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याची दुसरी पत्नीही आली समोर: म्हणाली लिंगपिसाट…

बदलापूर प्रकरण! आरोपी अक्षय शिंदे याची चिमुकल्यांसमोर ओळख परेड…

बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याच्या पहिल्या पत्नीकडून धक्कादायक खुलासे…

बदलापूर प्रकरणात नवं ट्विस्ट; आरोपीचे आई-वडिल म्हणाले…

बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या वडिलांचा खळबळजनक आरोप…

धक्कादायक! बदलापूरच्या आरोपीची झाली 3 लग्न; पाहा त्याची कुंडली…

Video: बदलापूरातील शाळेत चिमुकलींवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे आहे कोण?…

बदलापूर आंदोलकांवर कारवाई; 300 जणांवर गुन्हा तर 28 जणांना अटक…

बदलापूर हादरलं! दोन चिमुकल्यांवरील अत्याचाराची A टू Z कहाणी…

बदलापूरच्या शाळेत दोन चिमुकलींवर अत्याचार, अंगावर काटा आणणारी पोस्ट पाहा…

संतापजनक! अनैतिक संबंधातून जन्मलेल्या चिमुकलीचा घोटला गळा अन्…

धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…

बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्…

‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!