
नाशिक! डोंगराळे अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मालेगावच्या डोंगराळे येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्याची घटना दहा महिन्यांपूर्वी घडली होती. याप्रकरणी मालेगाव जलदगती न्यायालयात हा खटला चालवण्यात आला. या खटल्याचा आज (शुक्रवार) निकाल लागला असून, नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली आहे.
विजय खैरनार असे फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी खैरनारने डोंगराळे येथील रहिवासी असलेल्या चार वर्षीय चिमुकलीला चॉकलेटचं आमिष दाखवून तिचं अपहरण केले होते. यानंतर आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार करत तिचा खून केला. धक्कादायक बाब म्हणजे पीडित चिमुकली आरोपीला ‘दादा’ म्हणायची. मात्र त्याने ‘दादा’ नावालाच कलंक फासला आहे.
View this post on Instagram
संबंधित प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले होते. हे प्रकरण जलद गती कोर्टात चालवून आरोपी विजय खैरनारला फाशीची शिक्षा देण्याची मागणी संतप्त गावकऱ्यांनी केली होती. यानंतर आता अवघ्या दहा महिन्यात कोर्टाने खैरनारला फाशीची शिक्षा सुनावली आहे. मालेगाव अप्पर जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अलीकडेच २२५ पानांचे आरोपपत्र कोर्टात दाखल केलं होतं. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने एकूण २४ साक्षीदार तपासले. यात एका प्रत्यक्षदर्शी महिलेची आणि सात वर्षाच्या अन्य एका मुलीची साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने हा निकाल दिला आहे. याशिवाय पीडित कुटुंबाला दहा लाखांची मदत देण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत. या सगळ्या प्रकरणात फिर्यादीच्या वकीलांनी सुरुवातीपासूनच आरोपींला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली होती. आरोपीच्या वयाचा विचार न करता त्याने केलेल्या कृत्याचा विचार न्यायालयाने करावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. आता त्यानुसारच हा निकाल लागला आहे.
महाराष्ट्र हादरला! चिमुकलीवर अत्याचार करून डोकं ठेचलं; मृतदेह पाहून आक्रोश…
नसरापूर अत्याचार प्रकरणातील मोठी बातमी! आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा…
मैत्रीच्या नात्याला काळीमा; घरात घुसले अन् मित्राच्या पत्नीवर केला सामूहिक अत्याचार…
नाशिक! लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे 250 अश्लील Video व्हायरल…
नाशिक! प्राध्यापिकेचे अश्लील व्हिडिओ विद्यार्थ्याने केले स्क्रीन रेकॉर्ड अन्…

