
सावत्र आई अन् मुलाच्या अनैतिक संबंधांचा झाला थरारक शेवट…
बीड: सावत्र आई आणि मुलाच्या अनैतिक संबंधांचा अत्यंत थरारक शेवट झाला आहे. बदनामीच्या भीतीने मुलाने विष प्राशन करून, तर प्रियकराच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने सावत्र आईने रुग्णालयाच्या परिसरातच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे केज आणि अंबाजोगाई परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
केज तालुक्यातील सोनी जवळा येथील एका व्यक्तीचा पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट झाला होता. त्यानंतर चार वर्षांपूर्वी त्यांनी अनिता नावाच्या महिलेशी दुसरे लग्न केले. पहिल्या पत्नीचा मुलगा अनिल पवार (वय 21) याचे आपल्या सावत्र आईशी (अनिता) प्रेमसंबंध जुळले. काही दिवसांपूर्वी अनिल आणि अनिता हे दोघे घरातून थेट तेलंगणा राज्यात पळून गेले होते.
दरम्यान, आपली पत्नी आणि मुलगा दोघेही बेपत्ता झाल्याने पतीने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत तेलंगणा गाठून त्या दोघांनाही ताब्यात घेतले. आपले अनैतिक संबंध आता सगळ्यांना समजले आहेत या भीतीपोटी आणि नैराश्यातून अनिल याने विषारी औषध प्राशन केले. प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच अनिलचा मृत्यू झाला. आपला प्रियकर (नात्याने सावत्र मुलगा) अनिल याच्या मृत्यूची बातमी समजताच अनिताला विरह सहन न झाल्याने तिने स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय सभागृहाच्या पाठीमागे असलेल्या एका झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
नात्याला काळीमा! चुलतभाऊ अन् आजोबांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार…
नाशिक! सावत्र आईने अल्पवयीन मुलासोबत ओलांडल्या मर्यादा…
सावत्र बापाच्या गुप्तांगावर शारिरीक संबंधादरम्यान केले वार; घटना कॅमेऱ्यात कैद…
प्रेमसंबंध! दीर पहाटेच्या सुमारास वहिनीच्या खोलीत घुसला अन्…
लातूर! नवऱ्याचे अनैतिक संबंध अन् प्रेयसीला अडकविण्यासाठी जीव गेला चिमुकल्याचा…

