तुकाराम मुंढेंच्या दौऱ्यापूर्वी एफडीएची सातारा व कराडमध्ये मोठी कारवाई; ब्लिंकइटला दणका, दिवेकर बेकरी सील…
साताराः अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे शनिवारी कराडमधील शारदीय व्याख्यानमालेत तरूणाईशी संवाद साधणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर एफडीएच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. कराड शहरातील प्रसिद्ध दिवेकर बेकरी तसेच पार्सल सेवा पुरविणाऱ्या ‘ब्लिंकइट’च्या सातारा आणि कराड कार्यालयांवर छापा घालून परवाना निलंबित केला आहे. कराड नगरपालिकेच्या शारदीय व्याख्यानमालेला यंदा नगरपालिकेने एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे […]
अधिक वाचा...तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखालील एफडीएने केली कॅडिला औषध कंपनीची तीन गोदामे सीलबंद, कारण…
मुंबई: समान ब्रँड नावे आणि पॅकेजिंग संदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल महाराष्ट्र फूड अँड ड्रग प्रशासनाने, प्रसिद्ध औषध उत्पादक कंपनी कॅडिला फार्मास्युटिकल्सची ठाणे, पुणे आणि नागपूर येथील गोदामे सीलबंद केली आहेत. ही कंपनी ‘असिलॉक’ या ब्रँड नावाने वेगवेगळे सक्रिय घटक असलेली औषधे विकत होती. अधिकाऱ्यांच्या मते, ‘असिलॉक’ आणि ‘असिलॉक+’ या नावांमध्ये केवळ ‘+’ या चिन्हाच्या फरकामुळे […]
अधिक वाचा...वैद्यकीय उपकरणांवर तब्बल २,८४१ टक्के नफा; तुकाराम मुंढे यांचे केंद्रीय यंत्रणांना पत्र
मुंबई: वैद्यकीय उपकरणांची मूळ खरेदी किंमत आणि त्यावर छापलेली कमाल विक्री किंमत (एमआरपी) यात प्रचंड तफावत आहे, असे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासना’च्या (एफडीए) पाहणीत उघडकीस आले आहे. एका प्रकरणात ही नफ्याची टक्केवारी तब्बल २,८४१.१७ टक्क्यांपर्यंत पोचल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, आवश्यक वैद्यकीय उपकरणांच्या किमती रास्त करण्यासाठी आणि दरांचे नियमन करण्यासाठी ‘एफडीए’ आयुक्त तुकाराम […]
अधिक वाचा...तुकाराम मुंढे यांच्या पथकाचा मुंबईतील कॅफे मोंडेगरवर छापा; सुरक्षेतील त्रुटींमुळे परवाना निलंबित…
मुंबईः खाद्यविश्वातील एक महत्त्वाचे नाव असलेले दक्षिण मुंबईतील ‘कॅफे मोंडेगार’ आता तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) निशाण्यावर आले आहे. तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेतील त्रुटी आढळून आल्याने, एफडीएने छापा घालून जवळजवळ शंभर वर्षे जुन्या उपाहारगृहाचा परवाना निलंबित केला आहे. १९३२ मध्ये इराणी कॅफे म्हणून स्थापन झालेले, कुलाबा येथील हे उपाहारगृह, […]
अधिक वाचा...गणेश मंडळांकडून प्रसाद अन् अन्नदानासाठी एफडीए नोंदणी बंधनकारक; पाहा नवी नियमावली…
पुणे : प्रसाद आणि अन्नवाटप सुरक्षित व स्वच्छ ठेवण्यासाठी एफडीएकडून नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. अन्नदान करणाऱ्या गणेश मंडळांना अन्न व औषध प्रशासनाकडे नोंदणी करणे आवश्यक असणार आहे. नोंदणी १२ महिने, तीन महिने किंवा गणेशोत्सवाच्या दहा दिवसांसाठी घेता येणार आहे. तीन महिने आणि दहा दिवसांच्या नोंदणीसाठी १०० रुपये शुल्क असणार आहे. गणेशोत्सव काळात प्रसाद […]
अधिक वाचा...
