युवकाने महागड्या मोटारीसह घेतली थेट खाडीमध्ये उडी अन् पुढे…
ठाणे: एका युवकाने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने महागड्या गाडीसह थेट कोलशेत येथील टॉप क्रूज ऑटोमोबाईल गॅरेज गणपती विसर्जन घाटा जवळ असलेल्या खाडीमध्येच उडी घेतली. पस्थित नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालून त्याचा जीव वाचवला आहे.
खाडीत साधारण सायंकाळी साडेचारच्या सुमारास एक 25 वर्षांचा युवक भरधाव वेगाने गाडी घेऊन थेट खाडीमध्ये शिरला. सुरुवातीला उपस्थितांना वाटलं की गाडीवरील चालकाचा ताबा सुटून ती गाडी खाडीच्या दिशेने वळली आणि गाडी खाडीत पडली. यामुळे उपस्थित नागरिकांनी आपला जीव धोक्यात टाकून थेट खाडीमध्ये उडी मारून युवकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण तो तरुण बाहेर येण्याऐवजी त्याला वाचवायला गेलेल्या नागरिकालाच वाचवण्यास नकार देत होता आणि वारंवार मला मरू द्या, मला जगायचं नाही असं बोलत होता. तरीदेखील त्या नागरिकांनी त्या युवकाला जीव धोक्यात टाकून खाडी किनारी सुखरूप आणले.
बाहेर आल्यानंतर देखील तो युवक मला वाचवलं का? असं वारंवार बोलत होता. माझ्या जगण्याला काही अर्थ नाही, मला आता जगायचे नाही, असं तो वारंवार म्हणत होता.
युवकाच्या तोंडाला प्रचंड दारू प्यायलाचा वास येत होता, असे तिथे उपस्थित असलेल्यानी नागरिकांनी सांगितले. नागरिकांनी त्या तरुणाला विश्वासात घेऊन त्याच्या गाडीला अपघात झाला, का त्याने स्वतःहून गाडी टाकून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला? हे विचारलं, तेव्हा मी जीव द्यायलाच आलोय आणि मला आता जगायचं नाहीये, असे सांगून तो तरुण मोठमोठ्याने रडू लागला. शेवटी घडलेली घटना तात्काळ लक्षात येता काही उपस्थित नागरिकांनी या बाबतीमध्ये पोलिसांना माहिती दिली. पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्या पालकांना बोलवून त्या पालकांच्या स्वाधीन केले.
यश बिस्वास (वय २५, रा. ठाणे) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, पालकांना हे सर्व समजल्यानंतर मोठा धक्का बसला. मनदीप शिल्पकार या युवकाने आपला जीव धोक्यात टाकून यशचा जीव वाचवल्याबद्दल त्याचे पोलिसांनी कौतुक केले आहे.
युवकांच्या त्रासाला कंटाळून मुलीने घेतला जगाचा निरोप; चिठ्ठीत म्हटले की…
नात्याला काळीमा! अल्पवयीन पुतणीवर बलात्कार; सात महिन्यांची गर्भवती…
लाँचवर मासेमारी करणाऱ्या ऋषिकेशला लागले होते दारूचे व्यसन…
बहिणीच्या वाढदिवसाला जाताना दुचाकीला अपघात; महिलेचा मृत्यू…
प्रेमापायी कर्जबाजारी झालेल्या युवकावर आली नको ती वेळ…
बापरे! प्रेमास नकार देणाऱ्या मुलीची आईसमोरच केली हत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…