हृदयद्रावक! पिंपरीत अंगावर गेट पडल्याने चिमुकलीचा मृत्यू…

पुणे : पिंपरी-चिंचवडमधील बोपखेल परिसरात सोसायटीचा स्लाईड गेट अंगावर पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा जागेवरच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. गिरीजा गणेश शिंदे असे मृत्युमुखी पडलेल्या चिमुकलीचे नाव आहे. तिच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गिरीजा नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत खेळायला गेली होती. खेळताना हातात बाहुली घेऊन ती पळत सुटली. तेवढ्यात तिच्यासोबत खेळत असलेल्या मुलाने सोसायटीचे स्लाइड होणारे गेट ओढले. मात्र या गेटमध्ये बिघाड असल्याने ते गेट थेट गिरिजाच्या अंगावर पडले. हा प्रकार पाहून आजूबाजूच्या मुलांनी शेजारच्यांना आवाज दिला. त्यावेळी आजूबाजूचे लोक पळत आले आणि तिला उचलून दवाखान्यात नेण्याच्या प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच गिरिजाचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, गिरीजाच्या मृत्यूने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घराच्या मालकाने हलगर्जीपणा केल्याचे समोर आल्यास त्याच्या विरोध गुन्हा दाखल केला जाऊ शकतो, अशी माहिती दिघी पोलिसांनी दिली आहे.

पोलिसकाका Video News: 01 ऑगस्ट रोजीच्या Top 10 बातम्या…

यशश्री शिंदे हिच्या हत्येची इनसाईड स्टोरी; आरोपीने सांगितले…

हृदयद्रावक! ‘सॉरी बेटा, काळजी घे’ असे म्हणून समुद्रात झोकून दिलं…

हृदयद्रावक! उच्चशिक्षित युवकाने घेतला जगाचा निरोप; सुसाईड नोटमध्ये भावनिक…

शाळेत प्रेम! प्रेमविवाह केलेल्या पती पत्नीचा हृदयद्रावक शेवट…

हृदयद्रावक! पतीला फोन करून मुलीचं शेवटचं तोंड पाहा म्हणाली अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!