
नवरा दुचाकी पार्क करायला गेला अन् नवविवाहती पत्नी गायब; वेगळेच कारण समोर…
भोपाळ (मध्य प्रदेश): ग्वाल्हेरमध्ये नवरा गाडी पार्क करायला गेला असतानाच नवविवाहित पत्नी अचानक गायब झाली. परंतु, 20 दिवसांनी परत आली. प्रियकरासोबत पळून गेल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नवविवाहीत (वय १८) शिवपुरी जिल्ह्यातील नरवार येथून आपल्या पतीसोबत (वय २१) ग्वाल्हेरला दुचाकीवरून आली होती. पत्नीला प्राणीसंग्रहालयाच्या प्रवेशद्वाराजवळ थांबायला सांगितले आणि तो दुचाकी पार्क करायला गेला. मात्र परत आल्यावर ती तिथे नव्हती. त्यानंतर तिचा शोध सुरू झाला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, ती महिला एका अनोळखी व्यक्तीच्या मोटारसायकलवर बसून निघून गेल्याचे दिसून आले. आता ती महिला सापडली असून, तिने पोलिसांना रस्ता चुकल्यामुळे तिने एका व्यक्तीकडून लिफ्ट घेतली होती असे सांगितले.
View this post on Instagram
दरम्यान, पत्नी गायब झाल्यानंतर आपल्या काकांसोबत पोलीस ठाण्यात गेला आणि घडलेली घटना पोलिसांना सांगितली. पत्नी अचानक बेपत्ता झाल्यामुळे अस्वस्थ झालेल्या पतीने पोलिसांकडे तिला शोधून काढण्याची विनंती केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, प्राणिसंग्रहालय आणि परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासण्यात आले.
पतीला फुटेज दाखवल्यानंतर त्याने आपली पत्नी असल्याचे ओळखले. त्याने असाही दावा केला की, तिचे मोटारसायकलवरील त्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते, पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून महिलेचा शोध सुरू केला होता. सीसीटीव्ही फुटेज एक महत्त्वाचा पुरावा ठरले, कारण त्यात ती महिला एका पुरुषासोबत जाताना दिसत होती. सुमारे 20 दिवसांनी पोलिसांनी त्या महिलेला शोधून काढले. चौकशीदरम्यान तिने पोलिसांना सांगितले की, ती रस्ता चुकली होती, त्यानंतर तिने एका व्यक्तीकडे लिफ्ट मागितली आणि त्याच्यासोबत निघून गेली. पोलीस संपूर्ण घटनाक्रम समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
नवविवाहितीने प्रियकरासोबत ठोकली धूम; शिवाय पळून जाताना…
दुबईवरून प्रेयसी आल्याचे पाहताच कुलूप लावून ठोकली धूम…
लग्नानंतर कष्ट करून पत्नीला पोलिस बनवलं अन् नोकरी मिळताच ठोकली प्रियकरासोबत धूम…
हनिमूनच्या रात्रीच पत्नीने काढली नवऱ्याची खोड अन् ठोकली दिरासोबत धूम…
प्रेमविवाह ठरला अन् लग्नाच्या दिवशी नवरदेवाने ठोकली मेहुणीसोबत धूम…

