बीड! शिक्षकाने केला विद्यार्थिनींचा विनयभंग; पालकांचा चोप अन्…

बीड: गेवराई तालुक्यातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकाने शाळेतील चिमुरड्या विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बाबतची माहिती मुलींच्या पालकांना मिळाल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी शिक्षकाला अटक केली आहे.

लुखामसला येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अविनाश ढेरे हा शिक्षक कार्यरत आहे. याच शाळेत शिकणाऱ्या इयत्ता चौथीच्या चार विद्यार्थिनींसोबत या शिक्षकाने गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला. हा धक्कादायक प्रकार जेव्हा या पीडित मुलींनी घरी जाऊन आपल्या पालकांना सांगितला. संतापलेल्या पालकांनी तातडीने शाळा गाठली आणि आरोपी शिक्षक अविनाश ढेरे याला जाब विचारत चोप दिला.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, या प्रकारची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी तातडीने लुखामसला येथे धाव घेत आरोपी शिक्षक अविनाश ढेरे याला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करून घेण्यासाठी आणि कठोर कारवाईच्या मागणीसाठी मोठा जमाव गेवराई पोलिस ठाण्यात एकत्र आला होता. याप्रकरणी पोलिसांनी पालकांच्या तक्रारीवरून आरोपी शिक्षक अविनाश ढेरे याच्याविरोधात पोक्सो कायदा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

शालेय विद्यार्थिनींशी शिक्षकाकडूनच अश्लील चाळे; खरपूस चोप देऊन गावकऱ्यांनी दिले पोलिसांच्या ताब्यात…

कराटे प्रशिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप…

शिक्षकाने मेसेज करून विद्यार्थिनीला बोलावले अन् जबरदस्तीने मारली मिठी…

नगर हादरलं! विद्यार्थिनी घरात एकटी असताना शिक्षक यायचा अन्…

विद्यार्थिनी परीक्षा देण्यासाठी आली असताना शिक्षकाने केले गैरवर्तन; बेदम चोप…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!