
स्वारगेट प्रकरण! आरोपी दत्ता गाडे याने 22 हजार वेळा पाहिले अश्लिल व्हिडीओ…
पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस डेपोमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे याने एका युवतीवर 25 फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाचच्या सुमारास दोन वेळा बलात्कार केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद असून, पोलिसांनी या प्रकरणी 893 पानांचे आरोपपत्र पुणे न्यायालयात दाखल केले आहे.
आरोपी दत्ता गाडे याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. या अर्जाला पोलिसांनी विरोध दर्शवला असून त्यासंबंधी कारणांचा अर्ज शुक्रवारी न्यायालयात सादर करण्यात आला आहे. दत्ता गाडे याच्या मोबाईलमधून खळबळजनक माहिती समोर आली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याने मागील एका वर्षात तब्बल 22 हजार वेळा अश्लील चित्रपट पाहिल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने त्याच्या गुगल सर्च हिस्ट्रीची तपासणी केली असता ही धक्कादायक माहिती समोर आली.
आरोपी दत्ता गाडे याचा मोबाईल मिळून आला नसल्याने त्याचा नवीन मोबाईल नंबर प्राप्त करून सायबर तज्ञाद्वारे त्याच्या वापरत्या मेलची गुगल सर्च हिस्ट्री चेक केली. त्यावेळी तो वारंवार आणि भरपूर वेळा पॉर्न व्हिडीओ पाहत असल्याचे निष्पन्न झाले आहे. दत्ता गाडे याने अनेकदा पॉर्न व्हिडिओ बघून अश्लील कृत्य केल्याचे कबूल देखील केले आहे.
दरम्यान, आरोपीने पीडितेला खोटी माहिती देऊन बसमध्ये प्रवेश करण्यास सांगितले. त्यावेळी बसमध्ये कोणीही नसल्याने पीडिता खाली उतरत असताना, आरोपीने बसचे दोन्ही दरवाजे बंद केले आणि तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. आरोपीच्या मोबाईल नंबरचे तांत्रिक विश्लेषण केले असता, तो वारंवार स्वारगेट एसटी आगारात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्याला जामीन मिळाल्यास तो अशा प्रकारचे लैंगिक अत्याचाराचे गुन्हे करण्याची शक्यता आहे. तसेच तो पीडिता आणि साक्षीदारांना धमकावू शकतो. त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, अशी विनंती पोलिसांनी न्यायालयाला केली आहे.
पुणे! स्वारगेट प्रकरणातील पीडित युवतीचे पोलिसांवर गंभीर आरोप…
स्वारगेटच्या आरोपीबाबत पीडितेने जबाबात सगळं सांगितलं; आरोपीच्या खात्यात…
स्वारगेट अत्याचार प्रकरणात आरोपीच्या वकिलांचा धक्कादायक दावा…
आरोपी दत्ता गाडे याला पकडण्याचे श्रेय घेण्यासाठी सगळेच पुढे; पण खरं पकडलं कोणी पाहा…
पुणे पोलिस आयुक्तांनी आरोपी दत्ता गाडे बाबत दिली महत्तावाची माहिती; आत्महत्येचा प्रयत्न…
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड; तहान लागली अन्…
स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचे मिळाले लोकेशन…
पुणे पोलिसांनी दत्तात्रय गाडे याच्या मैत्रिणीला बोलावलं अन् माहिती आली समोर…
स्वारगेटच्या बसस्थानकात कंडोम, चादरी अन् दारुच्या बाटल्या…
पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार; अंधारात ताई-ताई बोलला…

