पुणे! लिव्ह इनमधील प्रेयसीच्या खूनाचे कारण सांगितले आरोपीने…
पुणे : प्रियकराने प्रेयसीची हत्या करून मृतदेह पुणे-बेंगलोर महामार्गावरील खंबाटकी घाटात फेकून दिला. नंतर स्वतःचं पोलिस स्टेशनमध्ये जाऊन प्रेयसी हरवल्याची तक्रार दिली. मात्र, पोलिस तपासात प्रियकराचे बिंग फुटले आहे. दिनेश ठोंबरे (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. जयश्री मोरे (वय २७) असे हत्या झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. हत्येनंतर दिनेशने तीन वर्षीय बाळाला आळंदीत सोडून दिले अन् स्वतः पसार झाला होता.
24 नोव्हेंबर 2024 ला ही घटना घडली होती, पण आरोपी एका चुकीमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला. पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आरोपी हा वाकडमध्ये एका फर्ममध्ये सुपरवायजर म्हणून काम करतो. त्याने जयश्री मोरे यांची हतोड्याने हल्ला करून हत्या केली. यानंतर त्याने मृतदेह वाकडपासून 130 किमी लांब खंबाटकी घाटात फेकला. यानंतर आरोपीने मृत महिलेच्या 3 वर्षांच्या मुलाला गायब केले. मुलगा गायब झाल्याची तक्रार त्याने पोलिसांना दिली.
मृत्यू जयश्री मोरे या बीड जिल्ह्यातल्या परळीची रहिवासी होत्या. लग्नाच्या 6 महिन्यांनंतरच ती पतीपासून वेगळी झाली होती. यानंतर ती पुण्यात आली. पुण्यात आल्यावर तिची आरोपीसोबत ओळख झाली आणि काही काळानंतर ते लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू लागले. महिलेचं दुसरीकडे अफेअर सुरू असल्याचा संशय आरोपीला आला. यानंतर दोघांमध्ये वाकड सर्व्हिस रोडवर जोरदार भांडण झाले. या वादात आरोपीने महिलेवर हल्ला केला आणि तिची हत्या केली.
दरम्यान, पोलिसांनी आरोपीचे फोन रेकॉर्ड तपासले, तेव्हा त्याचा फोन 24 ते 26 नोव्हेंबर या काळात बंद होता. यानंतर पोलिसांचा संशय आणखी बळावला आणि त्यांनी आरोपीची कसून चौकशी केली, तेव्ह त्याने हत्या केल्याचे कबूल केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन…
पायलट युवतीच्या आत्महत्येबद्दल पोलिस तपासातून धक्कादायक माहिती समोर…
धक्कादायक! पुणे शहराजवळ कोयत्याने सपासप वार करुन एकाची हत्या…
नांदेडमधील ‘त्या’ थरारक खुनाचा पोलिसांनी केला उलगडा…
जळगावमध्ये संशयावरून चिमुकल्यांची कुऱ्हाडीने वार करून हत्या; पुत्नीची मृत्यूशी झुंज सुरू…