युवती मुलाप्रमाणे वावरायची हे आई आणि भावाला खटकले अन्…
चंदीगड (हरियाणा): एका युवतीने (वय २७) आपली आई आणि धाकट्या भावाची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी युवतीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.
काजल असे आरोपी युवतीचे नाव आहे. तिची आई मीना आणि धाकटा भाऊ राहुल तिच्यावर लग्नासाठी दबाव आणायचे. तिला मात्र मुक्त जगायला आवडत होते. मुलांसारखी बेधडक जगायची. टी-शर्ट, जीन्स असेच कपडे घालत असल्यामुळे आई आणि भावाला आवडत नव्हते. तिने कृश (वय १८) या मामेभावाला हाताशी धरून हत्या करण्याचा कट रचला आणि हत्या केली.
पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. काजलच्या आजीने आपल्या मृत्यूआधी आपल्या घराचा वारस काजलच्या आईला केले होते. कृशला भीती वाटत होती, की काजलची आई हे घर तिच्या नावावर करील. तसेच, काजलच्या आईचा भाऊ आणि बहीण हेदेखील यामुळे नाराज होते. त्यामुळे काजलच्या आईशी त्यांचे बोलणे होत नव्हते. काजलचे वाढतं वय पाहून आई आणि भावाने काजलवर लग्नासाठी दबाव आणायला सुरुवात केली. ती ते मान्य करत नव्हती. कपड्यांवरून तिला बोललेलंही तिला आवडायचं नाही. आपल्या भावाचं लग्न आपल्याच एका मैत्रिणीशी व्हावे, असंही तिला वाटत होते.
काजल घरात वरच्या मजल्यावरच्या खोलीत एकटीच राहायची. इन्स्टाग्रामवर तिने व्हीआयपी नवाब नावाने एक आयडी बनवलेला आहे. त्यावरच्या सगळ्या व्हिडिओत ती पुरुषी कपड्यांतच दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, कौटुंबिक परिस्थितीचा फायदा घेऊन काजलने हे हत्याकांड घडवून आणले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पत्नीला मृत समजून अंत्यसंस्कारही केले; पण फोन सुरू होता…
घराचा दरवाजा उघडताच पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिले अन् फिरलं डोकं…
सासूने समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी सुनेवर केली जबरदस्ती अन्…
प्रेम! दाजी मेव्हणी सोबत तर तिची आई सासऱ्यासोबत पळाली…
दीर-वहिनीचे प्रेमसंबंध अन् मृत्यूनंतरही चार महिने ‘एक दुजे के लिए’…