ललित पाटील प्रकरण! ससूनचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण देवकाते यांना अटक…
पुणे : ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण देवकाते यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. ललित पाटील प्रकरणात दोषी आढळलेल्या ससून हॉस्पिटलचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना पदमुक्त करुन त्यांच्या विभागीय चौकशीचे तर आर्थोपेडीक सर्जन डॉक्टर प्रविण देवकाते चौकशी यांचे निलंबन करण्यात आले होते.
ड्रग माफिया ललित पाटील याला मदत केल्याचा आरोप असलेले ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चार सदस्यीय वैद्यकीय समितीने दोषी ठरवले आहे. या समितीच्या अहवालानुसार ललित पाटील याचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी त्याला डॉक्टर ठाकूर यांची मदत होत होती. डॉक्टर ठाकूर यांच्या सांगण्यावरून डॉक्टर प्रवीण देवकाते हे ललित पाटील आजारी असल्याचे खोटे अहवाल तयार करत होते. या दोन्ही डॉक्टरांचे हे कृत्य वैद्यकीय करताना डॉक्टर घेत असलेल्या शपथेला आणि वैद्यकीय व्यवसायाला अनुसरून नव्हते.
ललित पाटील प्रकरणी आता येरवडा कारागृह प्रशासन रडारवर आहे. कारागृहातील समुपदेशक आणि वैद्यकीय अधिकारी दोघेही अटकेत आहे. सुधाकर इंगळे मार्फत डॉ. संजय मरसळे यांना पैसे मिळाले होते. सुधाकर इंगळे आणि डॉ. संजय मरसळे या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. मरसळे हा ललित पळून जाण्याच्या दोन दिवस आधी त्याच्याशी संपर्कात होता. डॉ. संजय मरसळे यांनीच पैसे घेऊन ललित पाटील याला ससून रुग्णालयात दाखल करण्यासाठी “रेफर” केले जाते. डॉ. संजय मरसळे यांच्या मोबाईलमध्ये अभिषेक बलकवडे चे “कॉल” सापडले होते. बलकवडे हा ललित पाटीलचा ड्रग्स कंपनी सांभाळणारा साथीदार होता
ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांकडून आत्तापर्यंत ससून रुग्णालयातील 16 जणांची चौकशी करण्यात आली होती. ललित पाटील हा ससून रुग्णालयातील 16 नंबर वॉर्ड मध्ये दाखल होता. या वार्डमध्ये कार्यरत असणाऱ्या इतर स्टाफची सुद्धा पोलिसांनी चौकशी केली. ललित पाटील पलायन प्रकरणी ससूनमधील काही वरिष्ठ अधिकारी आणि डॉक्टर यांची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. ससून पाठोपाठ या प्रकरणात कारवाईचा बडगा आता येरवडा कारागृहातील प्रशासनावर देखील उगारण्यात आला आहे.
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई; दोन पोलिस बडतर्फ…
ललित पाटील प्रकरण! ससूनचे डीन पदमुक्त तर ऑर्थोपेडिक सर्जन निलंबित…
ड्रग माफिया ललित पाटीलसह 12 जणांवर मोक्का; आणखी 5 किलो सोने जप्त…
ललित पाटील याला पोलिस कोठडी; जीवाला धोका असल्याचा दावा…
ड्रग माफिया ललित पाटील पुणे पोलिसांच्या ताब्यात…
ललित पाटील प्रकरणी रोझरी स्कुलचा विनय अरहाना याला अटक…
ललित पाटील प्रकरण! नाशिकमध्ये नदीतून मध्यरात्री कोट्यवधींचा ड्रग्ज साठा जप्त…
ड्रग्ज माफिया ललित पाटीलचा कधीही एन्काऊंटर होऊ शकतो…
ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी अनेकांचे दणाणले धाबे…
ड्रग्ज माफिया ललित पाटील याला देशभर फिरवणाऱ्या चालकाला बेड्या…
ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या चौकशीत धक्कादायक खुलासे…
ड्रग माफिया ललित पाटील याच्या दोन मैत्रिणींना अटक; कारण…
ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पकडण्यात पोलिसांना यश; कसा अडकला पाहा…
ससून ड्रग्ज प्रकरणात आणखी सात आरोपी निष्पन्न; ललित पाटील आणि सोने…
ललित पाटील याच्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडे…
ललित पाटील नेमका पळाला कसा? याची होणार चौकशी…
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी दोघांना कोठडी; न्यायाधीशांनी खडसावले…
ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्र्याचा फोन…
ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालयातून १२ कैदी पुन्हा येरवडा जेलमध्ये…
ड्रग्स मफिया ललित पाटील याला पळून जाण्यात मदत कोणाची पाहा…
ड्रग्स मफिया ललित पाटील याला मोटारीतून घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात…
ससून रुग्णालयातून आरोपी पसार, नऊ पोलिसांचे निलंबन; पाहा नावे…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!