ज्येष्ठ अभिनेते दलीप ताहिल यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा…

मुंबई: बॉलिवूड अभिनेते दलीप ताहिल (वय ६५) यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. पाच वर्षांपूर्वीच्या एका गुन्ह्या प्रकरणी मुंबई दंडाधिकारी न्यायालयाने दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे.

मुंबईतील खार भागात अभिनेते दलीप ताहिल कार चालवत असतानाच त्यांनी एका रिक्षाला धडक दिली होती. ही घटना 2018 मध्ये घडली होती. रिक्षात असलेली महिला जखमी झाली होती. धडक दिल्यानंतर दिलीप ताहिल यांनी तिथून पळण्याचा प्रयत्न केला. पण, पुढे गेल्यावर गणपती विसर्जनाची मिरवणूक असल्याने ते अडकले होते. रिक्षाचालक त्यांचा पाठलाग करत असल्याने ते पडकले गेले. त्यांना कारमधून बाहेर येण्यास सांगितल्यानंतर त्यांनी महिलेशी हुज्जत घातली होती. यानंतर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली गेली. अभिनेत्याने ब्लड टेस्ट देण्यास नकार दिला. मात्र, नंतर ते नशेत असल्याचंही समोर आले. दलीप ताहिल यांना अटकही करण्यात आली होती. मात्र, लगेच त्यांची जामिनावर सुटका झाली होती. सध्या या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर त्यांना दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, दलीप ताहिल गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये काम करत आहेत. त्यांनी ‘बाजीगर’, ‘कहो ना प्यार है’, ‘सोल्जर’, ‘इश्क’, ‘रा.वन’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यांना खलनायक भूमिकांसाठीच जास्त ओळखलं जाते. आता दोन महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्याने ते चर्चेत आले आहेत.

आम्ही वेगळे झालोय! अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्र याचे ट्विट…

अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू; बलात्कार झाल्याचा आईचा आरोप…

अभिनेता शाहरुख खानला सरकारने पुरवली Y+ स्कॉट सुरक्षा; कारण…

Live Video: अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये अपघात; दोघांचा मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!