नवले पुलावरील जाळपोळप्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हे दाखल…
पुणे : पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या नवले पुलाजवळ मंगळवारी (ता. ३१) केलेल्या जाळपोळ प्रकरणी 400 ते 500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून गर्दी जमा केल्याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवले पुलावर मोठ्या संख्येने मराठा आरक्षणासाठी आंदोलक जमले होते. त्यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या. नवले पुलावर टायरची जाळपोळ करण्यात आली होती. रस्त्याच्या मधोमध टायर जाळल्याने नवले पुलाजवळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात कलम 336 आणि कलम 441 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी आंदोलकांची समजूत काढून तब्बल दोन ते अडीच तासांनतर वाहतूक सुरु करण्यात यश मिळवले होते. यावेळी मराठा आरक्षण आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीला काही झाल्यास आंदोलन आक्रमकपणे करु असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
पोलिस ॲक्शन मोडवर; गुन्हे दाखल; जमावबंदीचे आदेश…
पुणे शहरातील नवले पुलावर टायरची जाळपोळ; वाहतूक अडवली…
महाराष्ट्र बंदबाबत मेसेज व्हायरल; पोलिसांकडून आवाहन…
मराठा आंदोलन! पोलिस आता अलर्ट मोडवर…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!