बीड हादरलं! चिमुकलीवर पडक्या रूममध्ये सामूहिक बलात्कार…

बीड: बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये आठ वर्षाच्या चिमुकलीवर तीन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

एका हॉटेलच्या बाजूला असलेल्या पडक्या रूममध्ये नेऊन या तीनही मुलांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनही मुलांना अटक केल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. तसेच, वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

पीडित मुलगी रविवारी (ता. ३) सायंकाळी घराजवळ खेळत होती. यावेळी परिसरात राहणाऱ्या 14 वर्षीय असलेल्या तीन मित्रांनी तिला जवळच असलेल्या नदीच्या परिसरातील एका पडक्या घरामध्ये घेऊन गेले. त्यानंतर या मुलीवर आळीपाळीने बलात्कार केला. पीडित मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून रस्त्यावरुन जाणाऱ्या एका व्यक्तीने तिची मदत करण्यासाठी धाव घेतली. तसेच अल्पवयीन मुलांच्या तावडीतून मुलीची सुटका केली. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांना माहिती दिली गेली.

मुलीच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठले. तसेच, या प्रकरणी रविवारी रात्री अकरा वाजता शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तीनही अल्पवयीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही विधिसंघर्षग्रस्त बालकांच्या पालकांना पोलिसांकडून नोटीस देण्यात आली असून, या बालकांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर, गरजेनुसार तपासासाठी त्यांना हजर करण्याच्या सूचना पालकांना देण्यात आली आहे. सोबतच त्यांच्या वयाची खात्री करण्यासाठी शाळेचा प्रवेश निर्गम पाहून त्यांचे वय ठरवण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सासऱ्याने केला सुनेवर बलात्कार; तक्रार दाखल…

युवतीवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार; व्हिडिओ व्हायरल…

विकृती! भाडेकरूला मांजरावर बलात्कार करताना पकडले रंगेहाथ…

गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार…

मदरशातल्या 10 विद्यार्थ्यांवर शिक्षकाने केला अनैसर्गिक बलात्कार…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!