
घाटंजी न्यायालयाने कुर्ली येथील विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे रोखपालची केली निर्दोष मुक्तता…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कुर्ली येथील विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे रोखपाल आरोपी विनोद चंपतराव भास्करवार (60, श्रीराम अपार्टमेंट, समर्थवाडी, यवतमाळ) यांनी बॅकेत अपहार केल्याप्रकरणी घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा न्यायालय क्रमांक 2 प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अनिकेत कळमकर यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपी विनोद भास्करवार यांचे तर्फे ॲड. निलेश चवरडोल यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे कुर्ली शाखा व्यवस्थापक क्रीष्णा खंडेराव कुळकर्णी यांनी 10 ऑक्टोबर 2007 रोजी विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे रोखपाल विनोद चंपतराव भास्करवार यांनी विश्वासघात करुन बेकायदेशीर रित्या दस्तवेज अनधिकृत पणे खोडतोड केली. अशी फिर्यादी विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक कुर्ली शाखेचे व्यवस्थापक क्रीष्णा खंडेराव कुळकर्णी यांनी पारवा पोलिस ठाण्यात दाखल केली होती. त्यावरून आरोपी विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे रोखपाल विनोद भास्करवार यांचे विरुद्ध पारवा पोलिस ठाण्यात अपराध क्रमांक 42/2007 भादंवि कलम 409, 465 व 201 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. पारवा पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी सदर प्रकरणाचा तपास करुन घाटंजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे रोखपाल विनोद चंपतराव भास्करवार हे 24.8.1994 ते 19.6.2007 रोखपाल या पदावर कार्यरत होते. विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेच्या हद्दीतील झटाळा येथील कर्जदार सौ. एस. के. जैस्वाल यांना विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक शाखा कुर्ली ता. घाटंजी यांनी 8.4.2004 रोजी 9 हजार रुपयाचे कर्ज दिले होते. कर्जदार हिने सदरची रक्कम व्याजासह 20.5.2005 रोजी बॅकेत भरणा करून तशी पावती बॅकेकडून घेतली. त्यावर आरोपी विनोद भास्करवार यांनी गुन्ह्याची कबुली देऊन नुकसान भरपाई करुन देण्याची तयारी दर्शविली, असे घाटंजी न्यायालयाच्या आदेशात स्पष्टपणे नमूद आहे. रोखपाल विनोद भास्करवार यांनी ₹ 5,50,000 रुपयांचा भरणा सुद्धा विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेत केला होता. रोखपाल विनोद भास्करवार यांनी एकूण 25 कर्जदाराचे कर्ज, कर्ज खात्यात जमा न करता स्वतः हडप करून विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक शाखा कुर्लीची फसवणूक केली होती. तसेच बॅकेच्या लेजर मध्ये खोडतोड करुन, तारखा बदलवून ₹ 11,09,353/- रुपयांचा अपहार केला व बॅकेतील कर्ज प्रकरण गहाळ केले. सदर प्रकरणाचा तपास पारवा पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी करुन घाटंजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. मात्र, सदर प्रकरण यवतमाळ येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात चाचणी करिता हस्तांतरण करण्यात आले. सदर प्रकरणात आरोपी रोखपाल विनोद भास्करवार यांनी गुन्हा कबुल केला नाही. तदनंतर सदर प्रकरण पुन्हा घाटंजी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हस्तांतरण करण्यात आले.
सदर प्रकरणात आरोपी व फिर्यादी वकीलांनी युक्तिवाद केला. आरोपीच्या वकीलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून, घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा न्यायालय क्रमांक 2 प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अनिकेत अरुण कळमकर यांनी दिलेल्या आदेशानुसार, कुर्ली येथील विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे रोखपाल विनोद चंपतराव भास्करवार यांना भारतीय दंड संहिता 1960 चे कलम 409, 465 व 201 प्रमाणे अंतर्भुत वर्णिलेल्या अपराधातून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 248 (1) मधील प्रावधानित तरतूदी नुसार निर्दोष मुक्तता करण्यात आले आहे. तसेच आरोपी रोखपाल विनोद भास्करवार यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 437 – अ मध्ये नमूद प्रमाणे सहा महिन्याच्या कालावधीकरिता ₹ 15,000 चे वैयक्तिक बंधपत्र व तितक्याच रकमेचे जामिन पत्र दाखल करण्याचे आदेश दिवाणी व फौजदारी न्यायाधीश तथा न्यायालय क्रमांक 2 चे प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी अनिकेत कळमकर यांनी दिले आहे. आरोपी विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे रोखपाल विनोद भास्करवार यांची बाजू ॲड. निलेश चवरडोल यांनी न्यायालयात मांडली.
Video: पोलिसाच्या वर्दीतील फोटो अन् दहा महिला पोलिसांशी ठेवले शारीरिक संबंध…
पुणे जिल्ह्यात शिक्षकाने शाळेत केला अल्वपयीन मुलीचा विनयभंग; पाहा कारनामे…
हृदयद्रावक! आईच्या हातावर मेहंदी काढली अन् माय-लेकींचा मृत्यू…
मुलीच्या नावे चॅटिंग! युवकावर कोयत्याने हल्ला करणारे दोन तासात जेरबंद…
संगमनेर हादरलं! आठवडाभरात वाडेकर कुटुंबच संपलं; चौघांचीही आत्महत्या…

