
पुणे शहरात चोरट्यांनी मध्यरात्री फोडलं मिठाईचं दुकान अन् काय चोरलं पाहा…
पुणे : पुणे शहरातील येरवडा भागात असलेले मिठाईचे दुकान मध्यरात्रीच्या सुमारास फोडले आणि चोरट्यांनी दुकानातली अडीच किलो आंबा बर्फी चोरली आहे. मिठाई विक्रेते शैतान सिंह सवाई सिंह देवडा यांनी याप्रकरणी येरवडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रर दाखल केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
येरवड्याच्या गोल्फ क्लब रोडवर शैतान सिंह यांचं नारायण स्वीट मार्ट म्हणून दुकान आहे. गुरूवारी मध्यरात्री चोरांनी दुकानाचं कुलूप तोडले. दुकानात घुसल्यानंतर चोरांनी फायरिंगही केली. या चोरांनी गल्ल्यात असलेले 8 हजार 700 रुपये आणि अडीच किलो आंब्याची बर्फी लंपास केली. सकाळी देवडा दुकान उघडायला गेले तेव्हा त्यांना दुकानाचे कुलूप तोडलेले दिसले. हे समजल्यानंतर देवडा यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
देवडा यांच्या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र कुमार शेळके घटनास्थळी दाखल झाले. आंबा बर्फी चोरण्यासाठी दुकानाचे कुलूप फोडणे आणि फायरिंग करणे हे काम अट्टल चोराचे नसेल, एखाद्या नवशिक्या चोराने हा प्रकार केला असेल, असा संशयही व्यक्त केला जात आहे. दुकानात फार पैसे नसल्यामुळे चोरांनी मिठाईवर हात मारल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे पोर्शे कार अपघातातील धनिकपुत्राच्या वाढल्या अडचणी…
पुणे शहरात महाविद्यालयीन युवतीवर चौघांकडून अत्याचार…
पुणे शहरातील मुलींच्या डोळ्यां देखत खून; अनैतिक संबंधातून पत्नीनेच…
Video: पुणे शहरातील रस्ता खचला अन् दुचाकींसह संपूर्ण ट्रकच गेला खड्ड्यात…
पुणे शहरात कामाच्या ताणामुळे युवतीचा मृत्यू; अजित पवार म्हणाले…

