दोन बायका, नऊ मुलं अन् सहा गर्लफ्रेंड! अडकला पोलिसांच्या जाळ्यात…

लखनौ (उत्तर प्रदेश): दोन बायका, नऊ मुलं अन् सहा गर्लफ्रेंड असणारा एक व्यक्ती पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. त्याच्यावर विविध गुन्हे दाखल असून, पोलिसांनी त्याचा ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू केला आहे.

अजित मौर्य असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. सरोजिनी नगर येथील हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, अजित मौर्यवर पॉन्झी सारख्या बनावट योजना चालवणे, बनावट भारतीय नोटा चलनात आणणे, विमा योजनांद्वारे लोकांना फसवणे यांसारखे आरोप आहेत. धर्मेंद्र कुमार नावाच्या एका व्यक्तीने अजित मौर्यविरुद्ध एफआयआर दाखल केल्यानंतर पोलिसांना अजितच्या गुन्ह्यांची माहिती मिळाली. कुटुंबाचे पोट भरण्यासाठी गुन्हेगारीच्या जगात आल्याचे अजित मौर्य याने तपासादरम्यान पोलिसांना सांगितले. अजित मौर्य हा सहावीत नापास झाला होता. त्यानंतर तो मुंबईमध्ये कामाच्या शोधात आला होता. मुंबईत प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर करून फॉल्स सिलिंग बनवण्याचे काम अजित करत होता. पण त्या कामात त्याला यश मिळाले नाही.

अजितने 2000 मध्ये मुंबईतील 40 वर्षीय संगीतासोबत लग्न केले. संगीता आणि अजित यांना सात मुले आहेत. 2010 मध्ये नोकरी गेल्याने अजित हा पुन्हा त्याच्या गोंडा या गावी आला. 2016 मध्ये गोंडा येथे चोरी आणि घुसखोरीचा पहिला गुन्हा अजितवर दाखल झाला. तेव्हापासून अजितने गुन्हे करण्यास सुरुवात केली. 2019 मध्ये अजितने सुशीलाशी लग्न केले. सुशीला आणि अजित यांना 2 मुले आहेत.

अजितची दोन घरे आहेत, एक घरात संगीता राहते आणि दुसऱ्या घरात सुशीला राहते. पोलिसांनी अजितचे कॉल डिटेल्स तपासल्यानंतर लक्षात आले की अजितच्या सहा गर्लफ्रेंड्स आहेत. अजित विविध सोशल मीडियावर रिल्स शेअर करतो. त्याला अनेक लोक सोशल मीडियावर फॉलो देखील करतात. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दोन पत्नींसोबत एकत्र राहात असलेल्या पतीला एकीने पकडले अन्…

शारिरीक संबंधावरून मैत्रिणीच्या विवाहीत प्रियकराचे कापले गुप्तांग…

लॉजवर मैत्रिणीसोबत असताना शक्तीवर्धक गोळ्यांच्या अतिसेवनाने युवकाचा मृत्यू…

धक्कादायक! प्रियकर आणि प्रेयसीने चिरले एकमेकांचे गळे…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!