अशोक खरात प्रकरण! उज्ज्वल निकम यांची नियुक्तीमुळे दणाणले अनेकांचे धाबे…

मुंबईः राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या कायदेशीर लढाईत आता देशातील नामांकित कायदेतज्ज्ञ आणि ज्येष्ठ वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची अधिकृत नियुक्ती केली आहे. ॲड. निकम यांच्या एन्ट्रीमुळे या प्रकरणाशी संबंधित असलेल्या बड्या राजकीय नेत्यांचे आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण राज्यभरात चर्चेत आले आहे. दैवी शक्तीची भीती दाखवून, गुंगीचे औषध देऊन आणि प्रसाद म्हणून दिल्या जाणाऱ्या पेढा किंवा पाण्यातून अंमली पदार्थ देऊन तो महिलांचे लैंगिक शोषण करायचा. याप्रकरणी पीडित महिलांच्या तक्रारीनंतर नाशिक पोलिसांनी खरात याला अटक केली असून, या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून याचा तपास विशेष तपास पथकाकडे सोपवण्यात आला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

‘एसआयटी’ने या प्रकरणाचा सखोल तपास करताना आरोपी अशोक खरात याच्या कार्यालय आणि फार्म हाऊसची कसून झडती घेतली. या कारवाईदरम्यान पोलिसांच्या हाती अत्यंत धक्कादायक पुरावे लागले आहेत. महिलांचे लैंगिक शोषण करतानाचे तब्बल 100 हून अधिक अश्लील व्हिडिओ पोलिसांना मिळून आले आहेत. यावरून खरातने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढल्याचे स्पष्ट झाले आहे. खरातविरोधात लैंगिक अत्याचार, फसवणूक, ‘महाराष्ट्र नरबळी आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा’ अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, अशोक खरात याचे अनेक बड्या राजकीय नेत्यांशी आणि मंत्रालयातील उच्चपदस्थ प्रशासकीय अधिकाऱ्यांशी जवळचे संबंध असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता हा खटला थेट ॲड. उज्ज्वल निकम यांच्याकडे गेला आहे. उज्ज्वल निकम आता न्यायालयात सरकारची बाजू मांडणार असल्यामुळे राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; नामकर्ण आवारेला अटक…

भांडाफोड! अशोक खरात याचे ऑफिसनंतर फार्महाऊसमधील व्हिडीओ SITच्या हाती…

अशोक खरात याचा युवतीवर 4 वेळा अत्याचार, सहाव्या गुन्ह्याबाबत धक्कादायक माहिती…

अशोक खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट; पत्नीची कोर्टात धक्कादायक कबुली…

अशोक खरात केबिनमध्ये नेमका काय करायचा? सासू पार्वती म्हणाल्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!