
अधिकाऱ्याने चारित्र्याच्या संशयावरून अधिकारी पत्नीची केली हत्या…
अमरावती : अमरावतीमधील पशुधन विकास अधिकाऱ्याने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना अर्जुननगर येथील स्नेहा कॉलरीमध्ये घडली आहे.
चेतन सोळंके असे आरोपीचे नाव आहे तर दीप्ती चेतन सोळंके (वय 35) असे मृत महिलेचे नाव आहे. दीप्ती या देखील बँक अधिकारी होत्या. चारित्र्यावर संशय घेत चेतनने आपल्या पत्नीची हत्या केली. या प्रकरणात आरोपी पती चेतन आणि सासू, सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे. दीप्ती चेतन सोळंके या दर्यापूर येथील स्टेट बँकेत अधिकारी पदावर होत्या. तर आरोपी चेतन सोळंके हा पशुधन विकास अधिकारी आहे. त्याने दीप्ती यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांची हत्या केली. या प्रकरणात आरोपी पती चेतन आणि सासू, सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
अमरावतीच्या अर्जुननगर येथील स्नेहा कॉलनीतील ही घटना आहे. आरोपीने आधी आपल्या पत्नीची हत्या केली, आणि त्यानंतर ही हत्या नसून आत्महत्या आहे असे भासवण्याचा प्रयत्न केला. दीप्ती यांच्या डोक्यावर लोखंडी वस्तूने वार करण्यात आले, त्यानंतर त्यांचा मृतदेहाला गळफास लावण्यात आला. मात्र शवविच्छेदन अहवालामध्ये मृत्यूचे खरं कारण समोर आल्यानंतर पती आणि सासू, सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे जिल्ह्यात इमारतीवरून उडी मारून महिलेची आत्महत्या; चॅटिंगवरून…
पत्नीची संशयावरून केली हत्या अन् शीर घेऊन रस्त्यावर लागला नाचू…
धक्कादायक! जावयाने पत्नीच्या संशयावरून आख्खी सासुरवाडी संपवली…
धक्कादायक! संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीची केली हत्या अन् पुढे…
जावई म्हणतो सासूला; मला तुझ्याशीच लग्न करायचेय…

