पुणे! छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी निमित्त वाहतुकीत मोठे बदल, पाहा पर्यायी मार्ग…

पुणे: छत्रपती संभाजी महाराजांच्या 337व्या पुण्यतिथीनिमित्त शिरूर तालुक्यातील वढू बुद्रूक येथे मोठ्या संख्येने शिवभक्त मानवंदना देण्यासाठी दाखल होत आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

17 मार्चला रात्री 10 वाजल्यापासून ते 18 मार्चला रात्री 10 वाजेपर्यंत वढू बुद्रूक परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले आहेत. या कालावधीत नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

crime-book
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

कोणते मार्ग बंद, पर्यायी मार्ग कोणते घ्या जाणून…
कोरेगाव भीमा बाजूकडून चाकण-पाबळकडे जाणारी अवजड वाहतूक थेट मार्गाने सोडण्यात येणार नाही. ही वाहतूक कोरेगाव भीमा – सणसवाडी – शिक्रापूर – गॅस फाटा – वाजेवाडी चौफुला या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. तसेच चाकण-पाबळ बाजूकडून पुण्याकडे येणारी अवजड वाहतूक वाजेवाडी चौफुला – गॅस फाटा – शिक्रापूर – सणसवाडी – कोरेगाव भीमा या मार्गाने सोडण्यात येणार आहे. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी हा तात्पुरता बदल करण्यात आला आहे.

कोरेगाव भीमा बाजूकडून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना संस्थेजवळ निश्चित करण्यात आलेल्या स्टॉपेज पॉईंटच्या पुढे जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच चाकण आणि पाबळ मार्गे येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना वढू–वाजेवाडी चौफुला मार्गावरील पार्किंगसाठी ठरविण्यात आलेल्या स्टॉपेज पॉईंटपर्यंतच परवानगी राहणार आहे. या ठिकाणाच्या पुढे कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. मात्र व्ही.व्ही.आय.पी., व्ही.आय.पी. तसेच शासकीय वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातून बेपत्ता असलेल्या युवतीचा विहिरीत आढळला मृतदेह; कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर…

पुणे! मैत्रिणीने मेसेज करून भेटायला बोलावले अन् घरच्यांनी घेतला जीव…

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात सुविधांचा अभाव; नागरिकांची गैरसोय…

पुणे! नामांकित डॉक्टरने घेतला गळफास; सुसाईड नोटमध्ये लिहिलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!