
जावा-जावांच्या भांडणाला सख्खे भाऊ कंटाळले अन् नको ते केलं…
रांची (झारखंड): जावा-जावांच्या भांडणाला कंटाळलेल्या दोन भावांनी आपापल्या पत्नींची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुमला जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
गुमलाचे पोलिस अधीक्षक हरिस बिन जमा यांनी सांगितले की, ‘रुग्णवाहिका चालक शिव शंकर साहू आणि त्याचा भाऊ नवीन साहू यांनी सोमवारी आपापल्या पत्नींची हत्या केली. मिनी प्रिया (२८) आणि राधिका कुमारी (२०) अशी मृत महिलांची नावे आहेत. त्यानंतर त्यांनी दोघींचं शव रुग्णवाहिकेतून शेजारील सिमडेगा जिल्ह्यातील एका जंगलात नेऊन पुरले होते. भाऊ दोन्ही जावांमधील सततच्या वादामुळे त्रस्त होते.’
View this post on Instagram
भावांनी पोलिसांना सांगितले की, त्यांच्या पत्नी त्यांना काहीही न सांगता निघून गेल्या आहेत. मात्र, सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. चौकशीनंतर मृतदेह शोधून बाहेर काढल्यानंतर ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. हत्येसाठी वापरलेली कुऱ्हाड आणि मृतदेह नेण्यासाठी वापरलेली रुग्णवाहिका पोलिसांनी जप्त केली आहे. या प्रकरणातील आरोपींचे आई-वडील समेश्वर साहू आणि तिलेश्वरी देवी यांनाही अटक केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
बीड! मेडिकलच्या विद्यार्थिनीचा प्राध्यापकाकडून लैंगिक छळ; त्रासाला कंटाळून…
मंदार किवळे प्रकरण! पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली संपूर्ण माहिती…
गुजरातमध्ये जळगावच्या कुटुंबाला कालव्यात फेकण्यामागचं धक्कादायक कारण आलं समोर…
महाराष्ट्राचे सुपूत्र अन् IPS विनायक भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोठी कारवाई…
राजधानी हादरली! युवतीवर कॅफेत सामूहिक अत्याचार, तिघांना अटक…

