
चतुःश्रृंगी पोलिसांनी सशस्त्र दरोडा टाकणाऱ्यांना दोन तासातच केले जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या आरोपींना दोन तासामध्ये जेरबंद करण्यात चतुःश्रृंगी पोलिसांना यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी ०५/३० वा चे सुमारास विराज ऑटोमोबाईल्स अॅण्ड वॉशिंग सेंटर, विलास तात्या बालवडकर चौक, ज्युपीटर हॉस्पीटलचे मागे, डी.एस.के. गंधकोश इमारती शेजारी, बालेवाडी, पुणे याठिकाणी एका ऑटोमोबाईलच्या दुकानावर आठ ते नऊ जणांनी तीन दुचाकींवर येवून दुकान मालकास तसेच दुकानामध्ये आलेल्या त्यांच्या चार मित्रांना लोखंडी हत्याराने तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करून धमकावून त्यांचेकडील रोख रक्कम ४९,०००/- रु व २०,०००/- रु चा मोबाईल फोन असा एकूण ६९,०००/- रु चा मुद्देमाल हे जबरदस्तीने घेवून गेले होते. याबाबत फिर्यादी सिध्देश्वर दिगंबर ढेरे (वय ३४ वर्षे, धंदा मोटारगॅरेज, रा. फ्लॅट नं. ३०३, क्रिआंश बिल्डींग, पाटीलवस्ती, बालेवाडी, पुणे) यांनी चतुःश्रृंगी पोलिस स्टेशन येथे तक्रार दिल्याने गु. र. क्र. ७५८/२०२४ भा. न्या. सं. कलम ३१० ( २ ) ३११ सह भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१), १३५ अन्वये दाखल करण्यात आला आहे.
नमुद गुन्हयाच्या घटनास्थळी चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, पो. नि. (गुन्हे) युवराज नांद्रे, विजयानंद पाटील तसेच तपास पथकामधील आधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ भेट देवून घटनास्थळावरील सीसीटिव्ही फुटेज तपासून तपासाची चक्रे फिरवली. तपास पथकाने गोपनिय बातमीदारामार्फत माहिती काढून नमूद गुन्हा हा औंध येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार आल्ल्या सय्यद, मोहन आडागळे व देवा शिरोळे यांनी त्यांच्या साथीदारांसह केला असून ते सध्या पिंपळे गुरव येथे असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.
पोलिस पथकासह पिंपळे गुरव येथे जावून सापळा रचून गुन्हयातील आरोपी
१) अलीम ऊर्फ आल्ल्या सिंकदर सय्यद, रा. पी एम सी कॉलनी बिल्डीग, रुम नं. ४२, नागरास रोड, वात्सल्य विहार शेजारी, औध, पुणे,
२) देव ऊर्फ देवा काकासाहेब शिरोळे, रा. भोई गल्ली, विठठल मंदीराजवळ, कसबा पेठ, पुणे व
३) मोहन अरुण अडागळे, रा. जय गणेश कॉलनी, दत्तनगर, बाबुलाल किराणामाल दुकानाशेजारी, विधातेवस्ती, औध, पुणे यांना ताब्यात घेवून
अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान आरोपीतांनी सदरचा गुन्हा हा त्यांचे इतर पाच ते सहा अल्पवयीन साथीदारांसह केला असल्याची कबूली दिली आहे. गुन्हयाच्या तपासामध्ये आरोपींनी सदरचा गुन्हा हा पैशांच्या हव्यासापोटी केल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. तरी गुन्हयाचा पूढील तपास सहा. पोलिस निरीक्षक० नरेंद्र पाटील हे करत आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी पोलिस आयुक्त अमितेशकुमार, पोलिस सह-आयुक्त पुणे शहर रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मनोज पाटील, पोलिस उप आयुक्त, परि-४, पुणे शहर, हिंमत जाधव, सहा पोलिस आयुक्त, खडकी विभाग, पुणे शहर, अनुजा देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली चतुःश्रृंगी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्री युवराज नांद्रे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) विजयानंद पाटील, सपोनि नरेंद्र पाटील, पोउनि प्रणिल चौगुले, पोहवा दुशिंग, पोहवा वाघवले, पोवा दांगडे, पोहवा दुर्गे, पोहवा मोमीन, पोहवा विशाल शिर्के, पोहवा श्रीधर शिर्के, पोहवा माने, पोशि भांगले, पोशि खरात व पोशि तरंगे यांनी केली आहे.
पुणे शहरातील मुलींच्या डोळ्यां देखत खून; अनैतिक संबंधातून पत्नीनेच…
पुणे शहरातील रस्ता खचला अन् दुचाकींसह संपूर्ण ट्रकच गेला खड्ड्यात…
पुणे जिल्ह्यातील दोन मैत्रिणी मित्राच्या खोलीवर गेल्या अन् दारु पाजून अत्याचार…
धक्कादायक! पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून वर्गातील मुलाने केली महिलेची हत्या…
बिहारमधील शिक्षकाने पुण्यात येऊन चिरला पत्नीच्या प्रियकराचा गळा अन्…

