पोलिसकाका Video News: २५ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…

नमस्कार,
पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी…

‘क्राईम रिपोर्टिंग’ ऑनलाईन अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

पुण्यात तुफान पाऊस, खडकवासला धरणातून वेगाने पाण्याचा विसर्ग
पुणेः पुणे शहरात रात्रभर तुफान पाऊस सुरु असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा पाण्याच्या विसर्ग वाढवण्यात आला आहे. या मुसळधार पावसाचे पाणी सोसायटींमध्ये घुसले आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले आहेत.

पुण्यात ड्रायव्हरला मारहाण करणारा पोलिस कर्मचारी निलंबित
पुणेः पुणे शहरात पीएमपी बस चालकाला पोलिस कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर दोघांमध्ये समझोता पण झाला होता. पोलिस कर्मचारी राहुल वाघमारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

अनिल देशमुख यांनी तत्कालिन एसपींना धमकावल्याचा आरोप
मुंबई : अनिल देशमुख यांनी गृहमंत्री असताना जळगावचे तत्कालिन एसपी प्रवीण मुंढे यांना धमकी दिल्याचा धक्कादायक अहवाल सीबीआयने दिला आहे. या अहवालाच्या आधारे अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गिरीश महाजन प्रकरणात सीबीआयने हा धक्कादायक अहवाल सादर केला आहे.

ठाण्यातील युवतीने पाकिस्तानात जाऊन प्रियकराशी बांधली लग्नगाठ
मुंबई : ठाण्यातील एका युवतीची सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानमधील युवकासोबत ओळख झाली होती. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर तिने पाकिस्तान गाठले आणि युवकासोबत लग्न केले. १७ जुलै रोजी ती परत भारतात आली असून, ठाणे पोलिस तिची चौकशी करत आहेत.

मुरबाडमध्ये वायरमनला विजेचा धक्का लागून मृत्यू
ठाणे : मुरबाडमध्ये एका वायरमनला विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कमलाकर भोईर (वय ५३) असे मृत्युमुखी पडलेल्या वायरमनचे नाव असून, ते रस्त्यावरची वीज सुरू करण्यासाठी खांबावर चढले होते. यावेळी त्यांना शॉक लागून मृत्यू झाला आहे.

अपहरण झालेल्या एका मुलाचा मृतदेह सापडला; दुसरा बेपत्ता
बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंबाशी गावातून दोन दिवसांपूर्वी शेख अरहान शेख हारून (वय १०) या मुलाचं अपहरण झाले होते. या मुलाचा शोध घेत असताना त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. दुसरा 14 वर्षांचा मुलगा अजूनही बेपत्ता असून, पोलिस शोध घेत आहेत. पोलिसांनी शेख अन्सार /eला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने अपहरण करून अरहानचा गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली आहे.

शिर्डीत कचराकुंडीमध्ये बेवारस अर्भक मृत अवस्थेत आढळले
शिर्डी : शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या साईनाथ रुग्णालयाच्या प्रसूती वॉर्ड शेजारील कचराकुंडीत स्त्री जातीचे बेवारस अर्भक मृत अवस्थेत आढळून आले आहे. सफाई कर्मचारी सफाई करत असताना हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबई पोलिसांनी तब्बल दोन कोटीचे अंमली पदार्थ जप्त
मुंबईः वसई विरार पोलिस आयुक्तलयाच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधी विभागाने एक भारतीयासह विदेशी महिले कडून तब्बल दोन कोटीहून अधिकचे अंमली पदार्थ जप्त केले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबईत अटल सागरी सेतूवरून समुद्रात मारली उडी
मुंबई: मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवरून एका इंजिनिअरने उडी घेतली आहे. कारमधून उतरून समुद्रात उडी मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. श्रीनिवास कुरुकुट्टी (३८) असे या बेपत्ता युवकाचे नाव असून त्यांचा समुद्रात शोध घेतला जात आहे.

नेपाळमध्ये विमान कोसळून 19 जणांचा मृत्यू
काठमांडू (नेपाळ): काठमांडू येथून पोखराला जाणाऱ्या विमानाला अपघात झाला असून, १९ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. विमान जमिनीवर कोसळल्यानंतर भीषण आग लागली होती.

policekaka-special-offer

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!