
पुणे शहरात पत्नीची हत्या करून पोलिसांसमोर आत्मसमर्पण…
पुणे : पुणे शहरातील एका वर्षीय व्यक्तीने पत्नीची हत्या करून पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. लक्ष्मी केशव सीताफळे (वय 40, रा. लेबर कॅम्प खराडी) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केशव भीमराव सीताफळे (वय ४५) असे आरोपीचे नाव आहे. पत्नीसोबत त्याचा त्याच्या वाद झाले आणि त्यानंतर त्याने धारदार चाकूने तिचा गळा चिरला आणि नंतर खुनाची माहिती देण्यासाठी स्वत: पोलिसात हजर झाला. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिस पथकाला ही महिला रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसल्यानंतर याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
घरातील अनेक कारणांवरुन दोघांमध्ये वाद सुरु असायचे. यावेळीही असाच वाद झाला आणि दोघांमधील वाद टोकाला गेला. याच वादातून पतीने थेट पत्नीवर हल्ला केला यात पत्नीचा मृत्यू झाला. केशवने यानंतर पोलिस स्टेशन गाठलं आणि स्वत:च पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. चंदननगर पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरातील महिलेच्या पतीचे कोरोनात निधन, अल्पवयीन युवकासोबत शरीरसंबंध अन्…
पुणे शहरातील चिक्यासह त्याच्या दोन साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई…
पुणे शहरात फायनान्सची वाहने कमी किंमतीत देतो म्हणून मोठी फसवणूक…
पुणे शहरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; परदेशी युवतींची सुटका…
पुणे शहरात पुन्हा गँगवार आलं उफाळून; एकाची हत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…