टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणी राजस्थानात एका संशयिताला अटक; हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल…

मुंबईः बॉलिवुडचा अभिनेता टायगर श्रॉफवर केलेल्या प्राणघातक गोळीबाराच्या घटनेतील एका संशयिताला राजस्थानमधील कोटा येथे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रविवारी संध्याकाळी जुहूमध्ये झालेल्या गोळीबाराचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी या घटनेसंदर्भात अभिनेत्याचा चालक, फिरदौस याचा जबाब नोंदवला आहे. तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचा संशय आहे. फिरदौसवर सध्या नानावटी रुग्णालयात उपचार सुरू […]

अधिक वाचा...

अनैतिक संबंधाचा भयंकर शेवट, शिक्षकाकडून प्रेयसीची निर्घृण हत्या अन्…

नागपूर: एका शिक्षकाने त्याच्या प्रेयसीची हत्या करून मृतदेह स्वतःच्या घरातील खोलीत खड्डा करून पुरल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. १४ ऑक्टोबर रोजी चंद्रपूर शहरात ही हत्या करण्यात आली असून, आरोपीने मृतदेह नागपूरमधील हिंगणा परिसरात आणून लपवला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा अत्यंत कौशल्याने छडा लावत आरोपी शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला वैशाली […]

अधिक वाचा...

लष्करी अधिकाऱ्याची पत्नी चीनची गुप्तहेर? राष्ट्रीय सुरक्षेच्या कलमाखाली तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल…

नवी दिल्ली: चिनी गुप्तहेराच्या जाळ्यात अडकल्याच्या संशयावरून, एका लष्करी अधिकाऱ्याच्या पत्नीची जम्मू आणि काश्मीर पोलीस, लष्कर आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणा चौकशी करत आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला संयुक्त राष्ट्रांमध्ये इंटर्नशिप करत असताना परदेशी गुप्तचर यंत्रणांनी तिला अमिष दाखवले होते. ही महिला तेलंगणाची असून, लग्नाआधीपासूनच राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे पुरवणाऱ्या संशयितांच्या संपर्कात […]

अधिक वाचा...

सिंधुदुर्ग! एकतर्फी प्रेमातून दामिनी पालव हिचा खून; धक्कादायक माहिती समोर…

सिंधुदुर्ग: कॉलेज युवती दामिनी किरण पालव (वय २३) हिचा निर्घृण खून करणाऱ्या साहिल विश्राम धुरी (वय २२, रा. मठ- धुरीवाडा, ता. वेंगुर्ले) याला त्याच्या राहत्या घरातून स्थानिक गुन्हे अन्वेषण (सिंधुदुर्ग) पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याने एकतर्फी प्रेमातून चाकूने १७ ते १८ वार करून दामिनीचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. साहिल याला कुडाळ पोलिसांनी […]

अधिक वाचा...

Video : गोळीबारात टायगर श्रॉफचा जीव कसा वाचला? धक्कादायक माहिती आली समोर…

मुंबई: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर रविवारी (ता. १८) झालेल्या जीवघेण्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात टायगर श्रॉफसह कार चालक आणि आणखी एक जण जखमी झाला असला, तरी सुदैवाने टायगर सुखरूप असून त्याला किरकोळ दुखापत झाली आहे. जुहू येथील एका टर्फवर फुटबॉल खेळून टायगर रविवारी संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आपल्या घरी निघाला होता. कारमध्ये […]

अधिक वाचा...

बिश्नोई टोळीच्या गोळीबारात अभिनेता टायगर श्रॉफ बचावला; सलमान खानसोबत काम करणाऱ्यांना संपवण्याचा इशारा…

मुंबई: मुंबईच्या जुहू परिसरात आज (ता. १८) संध्याकाळी मोटारसायकलवरून आलेल्या तीन जणांनी केलेल्या गोळीबारात, अभिनेता टायगर श्रॉफ सुखरूप बचावला, मात्र त्याच्या वाहन चालकाच्या हाताला दुखापत झाली आहे. या घटनेनंतर समोर आलेल्या एका ऑडिओ फाईलमध्ये, लॉरेन्स बिश्नोई टोळीचा प्रतिनिधी असल्याचा दावा करणारा एक व्यक्ती, या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारताना आणि सलमान खानसोबत काम करणाऱ्या मुंबई चित्रपटसृष्टीतील इतरांना […]

अधिक वाचा...

राजस्थानच्या अलवरमध्ये कात्रीच्या साह्याने स्वतःच्या दोन मुलांची हत्या करून महिलेची आत्महत्या…

अलवर: राजस्थानच्या दतिया गावात रविवारी एका महिलेने आपल्या दोन मुलांवर कात्रीच्या साह्याने हल्ला करून त्यांचा जीव घेतला आणि नंतर स्वतः त्याच कात्रीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गंभीर जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. मृत व्यक्तीची ओळख उषा शर्मा अशी पटली असून, तिच्या मानेवर […]

अधिक वाचा...

तामिळनाडूमध्ये १०० कोटी रुपये किमतीचे १३७ किलो मेथाम्फेटामाइन ‘डीआरआय’च्या छाप्यात जप्त…

नवी दिल्ली: महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) तामिळनाडूच्या नागपट्टिनम जिल्ह्यातील एका किनारपट्टीवरील गावातून सुमारे १०० कोटी रुपये किमतीचे १३७ किलो क्रिस्टल मेथॅम्फेटामाइन हे प्रतिबंधित कृत्रिम अंमली पदार्थ जप्त केले आहे. अलिकडच्या वर्षांतील किनारपट्टी प्रदेशातील सर्वात मोठ्या अंमली पदार्थ जप्तींपैकी एक असलेल्या या छाप्यात, ‘डीआरआय’च्या अधिकाऱ्यांनी १६ आणि १७ ऑक्टोबर दरम्यान एक पाळत आणि अंमलबजावणी मोहीम राबवली. […]

अधिक वाचा...

आई-वडील झोपल्याची संधी साधून छत्रपती शिवाजी महाराज स्थानकातून चिमुकलीचे अपहरण; संशयित सीसीटीव्हीत कैद…

मुंबई: आई-वडिलांसोबत गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर आलेल्या अवघ्या एक वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण झाल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) रेल्वे स्थानकावर आई-वडील झोपलेले असताना एका अज्ञात महिलेने चिमुकलीला उचलून नेल्याचा आरोप आहे. सकाळी जाग आल्यानंतर मुलगी जवळ नसल्याचे पाहून आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला […]

अधिक वाचा...

दुर्गापूजा मंडपातील चेंगराचेंगरीत कोलकातामध्ये १९ भाविकांचा मृत्यू; दुर्गापूजा समितीच्या सचिवासह ७ जणांना अटक…

कोलकाताः येथील दुर्गा पूजेच्या मंडपात शनिवारी (ता. १७) रात्री झालेल्या चेंगराचेंगरीत १९ जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. किमान २५ जखमींना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दुर्गापूजा समितीच्या सचिवासह सात जणांना अटक केली आहे. चोरबागान दुर्गा पूजा समितीचे सचिव राज कुमार सेवड आणि उपाध्यक्ष शांतनु दुबे यांच्यासह बांबूची […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!