
सातारा येथील महिला सार्वजनिक शौचालयात भुताची चेष्टा अंगलट…
सातारा : सातारा येथे सार्वजनिक महिला शौचालयात भुताची केलेली चेष्टा अंगलट आली असून, अल्पवयीन मुलगा, महिला आणि त्यासह दोन युवकांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाच्या सुचनेनुसार सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
सातारा येथील कैकाड गल्लीत असलेल्या सार्वजनिक शौचालयात एक भयावह पुतळा ठेवण्यात आला होता. बसवलेल्या त्या पुतळ्याला साडी नेसवण्यात आली होती आणि त्याच्या डोक्यावर पदरही होता. तसेच त्या पुतळ्याला मेक अप केले होते. त्यामुळे रात्रीच्या अंधारात तो पुतळा अधिक भयावह दिसत होता. रात्री 11 वाजताच्या अंधाऱ्या रात्री कैकाड गल्लीतल्या दोन महिला शौचासाठी गेल्या आणि शौचालयातील तो पुतळा पाहून घाबरल्या होत्या.
महिलांच्या किंकाळ्यांनी संपूर्ण कैकाड गल्ली जागी झाली आणि मग शौचालयात आलेल्या या अघोरी पाहुणीची चौकशी सुरु झाली. नागरिक जमा झाल्यानंतर त्यांनी त्याला दगड मारुन बघितलं. मग तो पुतळा पडला आणि त्याला बाहेर काढले. संबंधित घटनेची जिल्ह्यात चर्चा झाली होती. यानंतर सातारा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, चेष्टा आणि प्रँक करावे पण त्याला काही मर्यादा असाव्यात, याचा परिणाम काय होईल हे तपासले पाहिजे. किमान सार्वजनिक ठिकाणी तरी अशा प्रकारचे प्रँक करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सातारामध्ये मित्रासोबत लॉजवर जाताना रंगेहाथ पकडले अन्…
सातारा येथे दोन डीजे व्यवसायिकांमध्ये खुन्नस; गुन्हा दाखल…
सातारा जिल्ह्यात भाविकांच्या मोटारीला भीषण अपघात; चौघांचा मृ्त्यू…
सातारा जिल्ह्यात लेकीचाही अपघाती मृत्यू; उदयनराजे यांची भावनिक पोस्ट…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

