घरच्यांनी मोडलं लग्न पण मुलीने त्याच्यासोबतच केलं लग्न अन् आता…

पाटणा (बिहार) : युवकाच्या प्रेमात पडलेल्या मुलीने घरातून पळून जाऊन लग्न केलं. त्यानंतर एक व्हिडिओ चित्रित करून तिने सोशल मीडियावर शेअर केला. हा प्रकार कुटुंबीयांना समजल्यानंतर मुलीच्या आईने जावयासह 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. बिहारमधील जमुईमध्ये ही घटना घडली आहे.

मुलीने आपला प्रियकर आणि कुटुंबीयांची भेट घालून दिली होती. तिच्या कुटुंबीयांनी प्रियकराच्या वयाची चौकशी केली. प्रियकराचं वय 35 वर्षं असल्याचे समजले. मुलाचे वय जास्त असल्याने मुलीच्या कुटुंबीयांनी त्याच्याशी लग्नाला विरोध केला; पण मुलीचे प्रेम होते. तिने घरातून पळून जाऊन केले. लग्नाबद्दल कळल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

पतीविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती मुलीला मिळताच तिनेही पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. मुलीने पोलिसांना सांगितलं, की आपण प्रौढ असून स्वतःच्या इच्छेने लग्न केलं आहे. मुलीच्या आईने आरोप केला आहे, की 15 जणांनी तिला घरातून जबरदस्तीने सोबत नेले होते. हे सगळे आरोप मुलीने फेटाळून लावले आहेत. मुलगी म्हणाली, “मी माझ्या प्रियकराची आणि माझ्या कुटुंबीयांची ओळख करून दिली होती. माझा प्रियकर 35 वर्षांचा आहे, हे समजल्यानंतर माझ्या घरच्यांनी हे नातं स्वीकारले नाही. मग मी स्वतःच्या इच्छेने घरातून पळून गेले आणि आम्ही लग्न केले. मी माझ्या पतीसोबत खूप आनंदी आहे. मला त्याच्यासोबत राहायचं आहे.”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पेंघी गावात राहणारी एक मुलगी घरातून पळून गेली होती. तिने पळून जाऊन आपल्या प्रियकराशी लग्न केले आहे. मुलीच्या आईचे म्हणणे आहे, की मुलीचं लग्न जबरदस्तीने लावण्यात आले आहे. मुलीचे म्हणणे आहे, की तिने स्वतः घरातून पळून जाऊन लग्न केलं आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सत्य उघड झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.’

Video: नवऱ्याने घराला लावला गुप्त कॅमेरा अन् पत्नीचे अनेक प्रियकर…

पत्नीला प्रियकरासोबत कारमध्ये रोमान्स करताना रंगेहात पकडलं अन्…

प्रेमाचा त्रिकोण! प्रियकरासाठी सपासप वार करून एकीने दुसरीला संपवलं…

धक्कादायक! प्रियकराच्या हत्येनंतर प्रेयसीने आरोपीसोबत बसून ओढले सिगारेटचे झुरके…

धक्कादायक! शरीर संबंधानंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू; अन् प्रियकर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!