
पुणे शहरात आईच्या डोळ्यादेखत मुलीचे एकतर्फी प्रेमातून अपहरण…
पुणे : पुणे शहरातील धनकवडी परिसरातून युवतीचे एकतर्फी प्रेमातून गुरुवारी (ता. २६) अपहरण करण्यात आले होते. मुंबईतून तिची सुटका करण्यात आली असून, या घटनेचा तपास सहकारनगर पोलिस करत आहेत.
मुलीचे अपहरण झाल्यानंतर पीडितेच्या आईने तातडीनं घटनेची माहिती सहकारनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाची चक्र फिरवली असता आरोपी पीडितेला घेऊन मुंबईच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांचे एक पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले. यानंतर आरोपी खालापूरवरून पुण्याच्या दिशेने एका बसमधून येत असल्याचे पोलिसांना कळाले, त्यानुसार पोलिस खालापूरला गेले आणि युवतीची सुटका केली. पण आरोपी फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी यश कातुर्डे नावाच्या युवकासह त्याच्या मित्रावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. यातला एक आरोपी पीडितेच्या ओळखीचा असल्याची माहिती आहेत. दोघातील एक जणाचे पीडितेवर एकतर्फी प्रेम होते. यातूनच हे अपहरण झाल्याची प्राथमिक माहिती आहे. दोन्ही आरोपी सध्या फरार असून, सहकार नगर पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. पण आईच्या डोळ्यादेखत तरुणीचं अशाप्रकारे अपहरण झाल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे.
मोहिनी वाघ आणि प्रियकर अक्षय जावळकर तपासादरम्यान येणार समोरासमोर…
ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाचं अपहरण! आज फक्त उचललंय, यानंतर जीवे मारू…
महाराष्ट्र हादरला! सरपंचाचे भर दिवसा अपहरण करून केला खून…
आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून हत्या; पोलिसांनी सांगितले की…
पुण्यातील घरमालकाचे एक कोटी रुपयांच्या खंडणीसाठी अपहरण करणाऱ्या तिघांना बंगालमध्ये अटक
Video: पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन जीवावर उदार होत अपहरण कर्त्यांची केली सुटका…

