पुणे! पोलिस अधिकारी गणेश तनपुरे यांचे हृदयविकाराने निधन; दोन दिवसांवर आली होती बदली…

पुणे : पुणे शहरातील आंबेगाव पोलिस ठाण्यातील गोपनीय शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक (ASI) गणेश तनपुरे (वय ५३) यांचे रविवारी (ता. ३१) दुपारी २:३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या अकस्मात जाण्याने पुणे पोलिस दलासह आंबेगाव आणि बिबवेवाडी परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी रात्री १०:०० वाजता गायमुख चौक, आंबेगाव […]

अधिक वाचा...

IPL 2026 फायनलनंतर मोठी दुर्घटना! खेळाडूंनी भरलेल्या टीम बसला लागली मोठी आग…

अहमदाबाद (गुजरात): IPL फायनलनंतर गुजरात टायटन्सच्या टीमसोबत धक्कादायक घटना घडली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरून खेळाडू हॉटेलवर जात असताना गुजरात टायटन्सच्या टीमच्या बसला आग लागली. यावेळी गुजरातचे सगळे खेळाडू बसमध्येच होते. त्यानंतर खेळाडूंना तातडीने खाली उतरवण्यात आले. शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. गुजरात टायटन्सचे खेळाडू नरेंद्र मोदी स्टेडियमवरून आपल्या हॉटेलकडे जाण्यासाठी संघाच्या बसमधून […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! बार्शीत क्रिकेटचा पीच तयार करताना रोल गेला अंगावरून…

सोलापूर : बार्शीतील शिवशक्ती मैदानावर आयोजित क्रिकेट समर कॅम्पमध्ये क्रिकेट पिच तयार करण्यासाठी वापरला जाणारा रोलर अंगावरून गेल्यामुळे आरव ऊर्फ वीरेन योगीराज चौधरी (वय १५) या नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सकाळी ७ ते ७:३० च्या दरम्यान ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत आरवचे वडील योगीराज चौधरी […]

अधिक वाचा...

पुणे शहरात लक्ष्मीनगर पोलिसांकडून दारूभट्ट्या चालवणाऱ्या महिलांसाठी प्रशिक्षण मेळावा…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील लक्ष्मीनगर पोलिस ठाण्याच्या पुढाकारातून येरवडा परिसरातील गावठी दारूभट्ट्या चालवणाऱ्या ज्येष्ठ महिला व विधवा महिलांसाठी रोजगार निर्मिती आणि स्वावलंबनाच्या उद्देशाने विशेष माहिती व प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला परिसरातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुणे शहराचे पोलिस आयुक्त, सह पोलिस आयुक्त तसेच अप्पर पोलिस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) यांनी लक्ष्मीनगर […]

अधिक वाचा...

पुण्यातील नामांकित IT कंपनीत नेमकं काय घडलं? रात्रीत गेले 700 जणांचे जॉब…

पुणे: हिंजवडीतील एका मोठ्या IT कंपनीने अचानक कार्यालयाला टाळे ठोकून पळ काढल्याने शेकडो सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, फ्रेशर्स आणि इंटर्न्स एका झटक्यात बेरोजगार झाले आहेत. कंपनीने कर्मचाऱ्यांचे पगार आणि इंटर्न्सची कष्टाची डिपॉझिट रक्कम थकवून पोबारा केल्याने आयटी क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व धक्कादायक प्रकार हिंजवडी फेज-२ मधील ‘गेराज इम्पेरियम राईज’ या इमारतीतून कार्यरत […]

अधिक वाचा...

जळगाव! युवक साखरुपड्यानंतर गेला प्रेयसीसोबत लॉजवर अन्…

जळगाव : पाचोरा शहरातील तरुण व्यावसायिक रवींद्र संजय मोरे याच्या लॉजमधील संशयास्पद मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक कलाटणी मिळाली आहे. सुरुवातीला लॉजमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत रवींद्र याचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, आता या प्रकरणात रवींद्रसोबत त्याच्या अल्पवयीन प्रेयसीनेही लॉजमध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी लॉज मालक, मॅनेजर आणि प्रेयसी विरुद्धही गुन्हा […]

अधिक वाचा...

पुणे! विषारी दारू प्रकरणी मोठी कारवाई, 9 पोलिस अधिकारी निलंबित, पाहा नावे…

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात खळबळ उडवून देणाऱ्या विषारी दारू विक्री प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तांनी मोठी कारवाई केली आहे. कर्तव्यात निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल आणि पर्यवेक्षणाचा अभाव असल्याचा ठपका ठेवत एकूण 4 पोलिस अधिकारी आणि 4 पोलिस कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित केले आहे. या धडक कारवाईमुळे पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. हडपसर पोलिस […]

अधिक वाचा...

धक्कादायक! सामूहिक हत्याकांडावेळी गोळीबार केला अन् चिरले सहा जणांचे गळे…

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याला लागून असलेल्या कर्नाटकमधून राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील गोविंदपूर भागामध्ये ६ जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोळीबार आणि गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडली असल्याची माहिती पुढे आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर गावात आज (शुक्रवार) सायंकाळी ही […]

अधिक वाचा...

पुणे हादरलं! प्रेयसीनंच फिल्मी स्टाईलने केलं प्रियकराचं अपहरण; कारण…

पुणे: एका युवतीने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका युवकाचे लग्नासाठी भररस्त्यातून फिल्मी स्टाईलने अपहरण केले. संबंधित प्रकार उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांनी थेट बीड जिल्हा गाठून युवतीसह तिच्या ७ साथीदारांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस चौकशीदरम्यान उघड झाले की, आरोपी युवती आणि नीलेश यांची आधीपासून मैत्री होती. तिची नीलेशसोबत लग्न करण्याची तीव्र इच्छा होती, मात्र नीलेश या लग्नासाठी […]

अधिक वाचा...

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे 13 जणांचा बळी; भावाच्या मृत्यूचा धक्का…

पुणे: पुणे आणि पिंपरी चिंचवडमधे विषारु दारु प्यायल्याने आत्तापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून, अनेकजण गंभीर आहेत. पिंपरी-चिंचवडमधील दापोडी आणि फुगेवाडी भागात मिळून आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर पुण्यातील काळे पडळ भागात तीन आणि हडपसर भागात दोन अशा पाच जणांचा मृत्यू झाला आहे. विषारी स्पिरिटयुक्त दारु योगेश वानखेडे याने बनवली होती. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!